Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

Devendra Fadanvis

समाजात जे काही चांगले आहे, त्याचा पुरस्कार केला पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.


विशेष प्रतिनिधी

Devendra Fadanvis  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे ‘नागरी सेवा दिन 2025 आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-24 व 2024-25 पारितोषिक प्रदान’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. स्पर्धेतील विजयी अधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा देत, संबोधित केले.Devendra Fadanvis

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात सध्या आपण पदार्पण केलेले आहे. भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यावेळी देशामध्ये एक नागरी सेवा असली पाहिजे, असा विचार व्यक्त केला होता. यामागे अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून देशाचा समतोल विकास साधला जावा हा उद्देश होता. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दुवा म्हणून अखिल भारतीय सेवा महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, असा दूरदर्शी विचार त्यावेळी भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता. त्या विचारानुसार आज अखिल भारतीय सेवा व विविध राज्यातील राज्यसेवा आपआपल्या राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील आपल्या एका भाषणात अधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले होते की, देशातील सामान्य माणसाला तुमच्यासारखे वागवणे हे तुमचे कर्तव्य आहे. या एका वाक्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे कर्तव्य व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांचे कर्तव्य यातला फरक समजावून सांगितला जो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रशासनिक सेवा अतिशय प्रगतिशील आहेत, संपूर्ण देशात आपल्या राज्यसेवेचे काम उत्तम मानले जाते. अखिल भारतीय सेवांमध्ये पात्र होणाऱ्या अधिकाऱ्यांचीही फर्स्ट चॉईस ही महाराष्ट्राचं असते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात प्रशासनाच्या बाबतीत जे नीती आणि नियम तयार करण्यात आले होते, ते त्याकाळानुसार सर्वोत्तम होतेच, पण आजही ते विचार कालजयी आहे, हे आपल्या लक्ष्यात येते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 30-35 वर्षांच्या अनुभवामध्ये अनेक अधिकाऱ्यांसमवेत काम करत असताना, एक लक्षात आले की, अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आज राज्यात जे काही मोठे परिवर्तन झालेले पाहायला मिळत आहे, त्यामागे राज्यातील समर्पित अधिकारी वर्ग आहे. अनेक उत्कृष्ट अधिकाऱ्यांसमवेत काम करत असताना, स्वतःलाही अनेक चांगल्या गोष्टी शिकता आल्या तसेच स्वतःचाही प्रशासक म्हणून अनुभव समृद्ध झाला, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

समाजात जे काही चांगले आहे, त्याचा पुरस्कार केला पाहिजे, त्याला सेलिब्रेट करता आले पाहिजे आणि त्यातून इतरांना प्रेरणा दिली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांसोबतचे त्यांचे अनुभव कथन केले. आपल्या समोर येणाऱ्या सामान्य माणसाला कुठलेही ट्रेनिंग नाही, तो साधारण आहे, त्याच्या सेवेसाठीच आपण याठिकाणी आहोत, याचा विसर कधीच पडला नाही पाहिजे. तसेच आपल्या कामात अधिक लोकाभिमुखता यावी, आपल्यामध्ये असलेली कंप्लेसेंसी दूर करून, नवनवीन तंत्रज्ञान अवगत करत, कायम सर्वोत्तम राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याच्या मुख्य सचिव व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra State is the leader in administrative service

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात