Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात माहिती मिळताच वांद्रे पोलिस झिशान सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या ईमेल आयडीवरून धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. तसेच 10 कोटींची खंडणी देखिल मागितली आहे. या पूर्वी देखील झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यामुळे आता सिद्दिकी कुटुंबीयांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Zeeshan Siddiqui

बाबा सिद्दिकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या प्रकारे तुझी हत्या करण्यात येईल, असा धमकीचा मेल झिशान सिद्दिकी यांना पाठवण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांनी याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू असा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे.



तसेच यात डी गॅंगचा उल्लेखही करण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांना गेल्या 2 दिवसांपासून धमकीचे मेल येत असल्याची माहिती आहे. या मेलमध्ये 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. रिमायंडर साठी प्रत्येकी 6 तासांनंतर मेल करणार असल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

विशेष बाब म्हणजे गेल्या 2 दोन दिवसांपासून झिशान सिद्दिकींना धमकीचे मेल येत आहेत. सध्या वांद्रे पोलिस झिशान सिद्दिकी यांच्या घरी दाखल झाले असून त्यांच्याकडून जबाब नोंदवणे सुरु आहे.

झिशान सिद्दिकी यांना यापूर्वी देखील धमकी देण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर दसऱ्याच्या दिवशी गोळीबार करण्यात आला होता. त्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. हे सुरु असतानाच झिशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

Zeeshan Siddiqui receives death threat; ransom of Rs 10 crore demanded

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात