पिंक ई-रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण केले जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पिंक ई-रिक्षा वितरण समारंभ, नागपूर जिल्हा’ येथे 50 महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. महिला व बालविकास विभागामार्फत पिंक ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचे अभिनंदन केले.
नागपूर येथे 2000 पिंक ई-रिक्षा महिलांना देण्यात येणार असून या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सशक्तीकरणाला चालना देणे आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय म्हणून पिंक ई-रिक्षा महत्त्वाची ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पिंक ई-रिक्षामुळे कुठलेही प्रदूषण होणार नाही. गुलाबी रंगामुळे ही रिक्षा उठून दिसेल. प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेसाठी, महिलांद्वारे संचालित अशा पिंक ई-रिक्षाचा वापर सर्वसामान्य जनता करू शकते.
मेट्रो स्थानकांवर फिडर सेवा म्हणून पिंक ई-रिक्षाचा वापर करण्यात येईल. या उपक्रमाअंतर्गत महिलांना निश्चित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रो प्रशासनासोबत करार करण्यात आला आहे. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी सुचविल्याप्रमाणे फिडर सर्व्हिसची आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी पिंक ई-रिक्षांना प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना परिवहन व पर्यटन विभागाला देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याप्रसंगी सर्व पिंक ई-रिक्षा चालक महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.
या योजनेंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व ई-रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार आशिष देशमुख, आमदार संदीप जोशी, लाभार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App