दिल्ली महापौर निवडणुकीतून आम आदमी पार्टीची माघार; पराभवाच्या खात्रीने सुचला राजकीय विचार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीतून आम आदमी पार्टीने माघार घेतली. या निवडणुकीत पराभवाची खात्री झाल्यानंतर आम आदमी पार्टीला माघार घेण्यावरून दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यामुळे भाजपने ट्रिपल इंजिन सरकार चालवावे, असा टोमणा मारत आम आदमी पार्टीचे नेते आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.

भाजपने आत्तापर्यंत वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक सोडून दिल्ली महापालिकेच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला. आम आदमी पार्टीचा महापौर करायचा असता तर आम्हालाही इतर पक्षांचे नगरसेवक फोडावे लागले असते, पण तेवढा पैसा आमच्याकडे नाही. आम्हाला नगरसेवक फोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यामुळे भाजपने त्यांचे ट्रिपल इंजिन सरकार दिल्लीत चालवावे असे वक्तव्य सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी पत्रकार परिषदेत केले.

2022 पासून 2025 पर्यंत आम आदमी पार्टीने दिल्लीच्या महापौर पदाची निवडणूक जिंकली होती. त्यावेळी काँग्रेस मधले नगरसेवक त्या पक्षाने फोडले होते. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आम आदमी पार्टीची ताकद सतत घटत गेली. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत पराभव दिसला म्हणून त्या पक्षाने या निवडणुकीतून माघार घेऊन टाकली. पण ती माघार घेताना आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी नैतिकतेचा मुखवटा आपल्या चेहऱ्यावर चढावला.

AAP Delhi President Saurabh Bharadwaj says, “We have decided that we will not field an Aam Aadmi Party candidate in the Mayor’s elections this time.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात