
वृत्तसंस्था
पुणे : Mangeshkar Hospital ईश्वरी ऊर्फ मोनाली संतोष भिसे (३७) मृत्यू प्रकरणात वेगवेगळे चार चौकशी अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झाले. यामध्ये राज्य सरकारने नेमलेल्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. सुश्रुत दिलीप घैसास यांच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. परंतु ससून रुग्णालयाने केलेल्या चौकशीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व डॉ. घैसास यांच्यावर दोष न ठेवता इतर ३ रुग्णालयांवर खापर फोडले होते. मात्र, पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाकडे डॉ. घैसास यांच्याबाबतच्या स्पष्ट अहवालाची मागणी करत घटनेच्या १९ दिवसानंतर डॉ. घैसास यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा अलंकार पोलिस ठाण्यात दाखल केला. मात्र, घैसास घटनेवेळी काम करत असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सूचनेनुसार २० लाख रुपयांची मागणी करूनही आणि पैसे नसल्याने अतिजोखीम असलेल्या प्रसूती उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयास कारवाईपासून अभय दिल्याचे दिसून आले आहे.Mangeshkar Hospital
याबाबत डॉ. घैसास यांच्या विरोधात मृत ईश्वरी भिसे यांची नणंद प्रियंका अक्षय पाटे (रा.विश्रांतवाडी, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. घैसास यांनी ईश्वरी भिसे यांची तब्येत गंभीर असतानादेखील पैशासाठी भिसे कुटुंबास वेठीस धरले. रुग्णावर साडेपाच तास कोणतेही सुवर्णकालीन उपचार (गोल्डन अर्वस ट्रीटमेंट) केली नाही, त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली आणि रुग्णावर उपचारासाठी केलेल्या दिरंगाईमुळे रुग्णास जीव गमवावा लागला. वेळेत भरती करून उपचार केले नसल्याने डॉ. घैसास यांच्याकडून हलगर्जीपणा झाल्याने असल्याने ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी घैसास यांच्यावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mangeshkar Hospital controversy: Case of negligence filed against Dr. Ghaisas in Ishwari Bhise death case
महत्वाच्या बातम्या
- Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार
- Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या
- Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी
- UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही