वृत्तसंस्था
मालदा : waqf सुधारणा कायदा विरोधात बंगालमधील धर्मांध मुस्लिमांनी मुर्शिदाबाद मध्ये दंगल आणि जाळपोळ करून महिलांवर अत्याचार केले. तिथल्या हिंदूंना आपल्या घरांमधून पलायन करणे भाग पाडले. या अत्याचारग्रस्त महिलांची दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी मालदा मधल्या शरणार्थी शिबिरात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी तिथल्या महिलांनी अक्षरशः विजयाताईंच्या गळ्यात पडून अंगावर काटा आणणारे भयानक अनुभव कथन केले.Vijaya Rahatkar
केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या waqf सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली पश्चिम बंगाल मधल्या मुर्शिदाबाद, जंगीपूर जिल्ह्यातल्या धर्मांध मुस्लिमांनी तिथे दंगल केली. पोलिसांवर हल्ले करून हजारो हिंदू समाजाच्या वाहनांची आणि मालमत्तांची जाळपोळ केली. तिथल्या शेकडो हिंदू कुटुंबांना परागंदा व्हायला लावले. या धर्मांध मुस्लिमांनी हिंदू महिलांना घरातून खेचून बाहेर काढले. त्यांच्यावर हात टाकले. त्यांचे उत्पीडन केले. प्रचंड दहशत माजवून हिंदूंना घरे सोडणे भाग पाडले.
त्यामुळे तब्बल 800 पेक्षा जास्त हिंदू कुटुंबांना मालदा जिल्ह्यातल्या शाळांमध्ये शरणार्थी शिबिरात राहावे लागले. आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर तिथे पोहोचल्या. त्यावेळी महिलांनी त्यांच्या गळ्यात पडून आपल्यावर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगितली. मुस्लिम गुंडांनी घरेदारे लुटली. जे लुटता येणार नाही, त्याची जाळपोळ केली. तरुण मुलींच्या अंगावर हात टाकले. वृद्ध महिलांना, लहान मुलामुलींना सुद्धा त्यांनी सोडले नाही. त्यांना मारहाण केली. मुर्शिदाबाद मध्ये परत न येण्याच्या धमक्या दिल्या. हिंदू समाजाच्या अनेक प्रॉपर्टीज मुस्लिम गुंडांनी बळकावल्या. या सगळ्या भयानक कहाण्या या महिलांनी विजया त्यांच्या कानावर घातल्या.
विजयाताईंनी या महिलांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या मनावर झालेल्या जखमांवर मायेची फुंकर घातली. अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी राष्ट्रीय महिला आयोग ठाम उभा राहिल्याचे आश्वासन दिले. बंगाल मधल्या दंगल पीडित महिलांना न्याय दिल्याशिवाय राष्ट्रीय महिला आयोग स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही विजयाताई रहाटकर यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App