विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल मध्ये waqf सुधारणा कायद्याच्या विरोधात धर्मांध मुस्लिमांनी जाळपोळ आणि दंगल करून मुर्शिदाबाद, जंगीपूर, मालदा इथल्या हिंदूंमध्ये दहशत पसरवली. 800 पेक्षा अधिक घरांना टाळे लावले. त्यामुळे तिथल्या अल्पसंख्यांक हिंदू समाजाला पश्चिम बंगालच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आणि झारखंडमध्ये आश्रय घ्यावा लागला. या हिंसाचाराचा देशभरातल्या सामान्य नागरिकांनी निषेध केला. हिंदूंमध्ये याविषयी प्रचंड संताप निर्माण झाला. पण राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधकांनी मात्र बंगाल मधल्या हिंसाचारावर मूग गिळून गप्प राहाणे पसंत केले.
पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद मोहन बोस राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा विजयाताई रहाटकर आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे प्रतिनिधी आज एकाच दिवशी पश्चिम बंगाल मधल्या दंगलग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले. तिथे या सर्वांनी दंगलग्रस्त समाजाची भेट घेऊन त्यांना आधार दिला. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांच्या दौऱ्यामध्ये अडथळा आणला. राज्यपालांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा करू नये त्यांनी मुर्शिदाबाद किंवा मालदा इथे जाऊ नये, असे दडपण ममता बॅनर्जी यांनी आणले पण राज्यपालांनी त्या दडपणाला झुगारून देऊन मुर्शिदाबाद, जंगीपूर आणि मालदा यांचा दौरा केला.
#WATCH | "…The cult of violence is a reality in Bengal. We have two things: cancerous growths on the body politic of West Bengal – one is violence, and the other is corruption. We have to strike at the roots of this. I'm sure that victory will be ours…" says West Bengal… pic.twitter.com/PSGjXoMf7T — ANI (@ANI) April 18, 2025
#WATCH | "…The cult of violence is a reality in Bengal. We have two things: cancerous growths on the body politic of West Bengal – one is violence, and the other is corruption. We have to strike at the roots of this. I'm sure that victory will be ours…" says West Bengal… pic.twitter.com/PSGjXoMf7T
— ANI (@ANI) April 18, 2025
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यादेखील मालदा इथे शरणार्थी शिबिरात दंगलग्रस्त भागातील महिलांना भेटल्या. त्यांची दुःख त्यांनी जाणून घेऊन त्यांना आधार दिला. त्याचबरोबर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. काँग्रेसचे माजी खासदार आणि लोकसभेतले माजी गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी देखील व्यक्तिगत पातळीवर दंगलग्रस्त भागाचा दौरा केला.
पण या सगळ्यावर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी मात्र मूग गिळून गप्प राहिले. त्यांनी बंगाल मधल्या हिंसाचारावर चकार शब्द उच्चारला नाही. ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर फक्त मोदी सरकारला वेगवेगळ्या ठिकाणांहून झोडपत राहिले. पण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ब्र शब्द उच्चारण्याची त्यांनी हिंमत केली नाही. बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील बंगाल मधल्या दंगलग्रस्त हिंदू समाजाविषयी सहानुभूती दाखवली नाही. ते फक्त वेगवेगळ्या कारणांची खुसपटे काढून मोदी सरकारला ठोकत राहिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App