Waqf सुधारणा कायद्याला दाऊदी बोहरा समुदायाचा पाठिंबा; पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन मानले त्यांचे आभार!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने देशात आणलेल्या waqf सुधारणा कायद्याला दाऊदी समुदायाने पाठिंबा दिला असून त्या समाजाच्या प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी आणि दाऊदी बोहरा समुदायाचे प्रतिनिधी यांच्या विशेष संवाद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेला समुदायाने पाठिंबा दिला. Waqf Amendment Act.

यावेळी झालेल्या चर्चेत दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधींनी मुंबईतल्या भेंडी बाजार इथल्या waqf मालमत्तेचा उल्लेख केला. 2015 मध्ये ही मालमत्ता दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधींनी खरेदी केली. पण नंतर नाशिक आणि अहमदाबाद मधून कोणीतरी येऊन त्या जागेला waqf जाहीर करून टाकले. कुणीतरी तिथल्या 700 स्क्वेअर फुटाच्या जागेत नमाज पढायला सुरुवात केली आणि कालांतराने ती जागा आणि त्या भोवतीची मोठी जागा waqf म्हणून घोषित केली. तिथे निवासी गाळे होते. दुकाने होती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती जागा परस्पर waqf म्हणून जाहीर केली. मात्र, पूर्वीच्या कायद्यानुसार त्यावर कुठली सुनावणी होऊ शकली नाही. मात्र नव्या कायद्यामुळे हे प्रकार यापुढे थांबतील, असा विश्वास समुदायाच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान मोदींशी बोलताना व्यक्त केला.

नव्या कायद्यातील तरतुदीनुसार दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधींना देखील waqf बोर्डामध्ये स्थान द्यावे लागेल. त्यामुळे समुदायाचा आवाज waqf बोर्डात‌ उमटेल, याविषयी देखील समुदायाच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. दाऊदी बोहरा समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरू सय्यदना साहेब यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते संबंध अधिक वृद्धिंगत होत दोघांनाही परमेश्वराने आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो, अशी प्रार्थना समुदायाच्या सदस्यांनी यावेळी केली. पंतप्रधान मोदींनी देखील दाऊदी बोहारा समुदायाशी असलेल्या जुन्या संबंधांना उजाळा दिला. Waqf सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यात दाऊदी बोहरा समाज, शिया समुदाय, अहमदिया समुदाय यांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख मोदींनी केला. 2019 पासून waqf सुधारणा कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू उपस्थित होते.

Dawoodi Bohra community met PM Modi today to thank him for the Waqf Amendment Act.

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात