विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : waqf सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद, मालदा आणि जंगीपूर मध्ये प्रचंड हिंसाचार घडवून तिथल्या हिंदूंना कायमचे पलायन करायला लावण्याच्या निंदनीय घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी घेतली असून त्यांनी तिथल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या चौकशी आणि तपासासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची एक समिती नेमली आहे. उद्या 17 एप्रिल ते 19 एप्रिल अशा तीन दिवस स्वतः विजयाताई पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात असून त्या मुर्शिदाबाद, मालदा आणि अन्य ठिकाणी जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देणार आहेत.
Waqf सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली धर्मांध मुस्लिमांनी पश्चिम बंगाल मधल्या मुर्शिदाबाद, मालदा आणि जंगीपूर या जिल्ह्यांमध्ये प्रचंड दंगली घडविल्या. हिंदूंच्या हत्या केल्या. मुर्शिदाबाद मधल्या मंदिरपारा परिसरात महिलांवर अत्याचार केले. तिथल्या हिंदू समाजात दहशत पसरवून हिंदू कुटुंबीयांना कायमचे पलायन करायला भाग पाडले. शेकडो महिलांना भागीरथी नदी ओलांडून मालदा मध्ये सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे भाग पाडले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहाटकर यांनी या हिंसाचाराची गंभीर दखल घेतली. त्यांनी बंगाल मधल्या महिला अत्याचाराच्या घटनांची चौकशी आणि तपास करण्यासाठी महिला आयोगाची एक टीम नेमली असून या टीम बरोबरच त्या स्वतः पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. उद्या 17 एप्रिल रोजी सायंकाळी त्या कोलकात्यात पोहोचत असून 18 तारखेला मालदा येथे जाऊन त्या पीडित कुटुंबीयांची गाठभेट घेऊन त्यांना मानसिक आधार देणार आहेत. त्याच दिवशी त्यांनी मालदामध्ये पोलीस अधीक्षक, जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून त्या बैठकीत कुटुंबीयांसंदर्भात नेमके काय संरक्षणात्मक उपाय करता येतील, याविषयी चर्चा करणार आहेत. 19 एप्रिलला त्या मुर्शिदाबाद, समशेरगंज आणि जाफराबाद येथे भेट देणार असून तिथे देखील दंगलीमुळे पीडित झालेल्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे.
या दौऱ्यामध्ये विजयाताई रहाटकर यांच्या समवेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीममधल्या डॉ. अर्चना मुजुमदार आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपसचिव डॉ. शिवानी डे या देखील असणार आहेत. महिला आयोगाची टीम तिथल्या महिलांशी संवाद साधणार आहे. दंगलखोर धर्मांध प्रवृत्तींविरोधात कायमची कठोर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अहवाल तयार करणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग त्या अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App