विशेष प्रतिनिधी
नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून गळती रोखण्यासाठी काय करावे??, या विचारात असणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी अफलातून कल्पनेची आयडिया लढवून उद्या 16 एप्रिल 2025 रोजी नाशिक मध्ये बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray ) आत्तापर्यंत न ऐकलेले भाषण वाजविणार असल्याचा गाजावाजा केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे नाशिक मध्ये येऊन शिवसेनेच्या उत्तर भारतीय विभागीय मेळाव्यात भाषण करणार त्यापेक्षा बाळासाहेबांचे आत्तापर्यंत न ऐकलेले भाषण ऐकायला मिळणार. त्या भाषणात नेमके काय असणार??, याविषयी चर्चा सुरू झाली. बाळासाहेबांच्या न ऐकलेल्या भाषणाविषयी उत्सुकता निर्माण करण्यात उबाठा शिवसेना सुरुवातीला यशस्वी झाली.
पण प्रत्यक्षात त्यांना ऐकलेल्या भाषणाचा फुसका बार निघाला, असेच नंतर स्पष्ट झाले. कारण बाळासाहेबांचे “न ऐकलेले भाषण” असा जो गाजावाजा करण्यात आला, तो प्रत्यक्षात बाळासाहेबांचा आवाज AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत काढून बाळासाहेबांचे भाषण ऐकविण्याचा प्रकार असल्याचे उघड झाले. या AI भाषणातून बाळासाहेब त्यांच्या हयातीनंतरच्या नव्या परिस्थिती विषयी भाष्य करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गळती रोखायचा प्रयत्न करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ नयेत यासाठी उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी ही राजकीय युक्ती काढली आहे.
पण बाळासाहेबांचे आत्तापर्यंत न ऐकलेले भाषण असा प्रचाराचा गाजावाजा करून नाशिक अधिवेशन गाजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेची ही युक्ती प्रत्यक्षात अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी फसली. कारण बाळासाहेबांच्या AI भाषणातून स्वतः बाळासाहेब बोलणार नाहीत, तर उद्धव ठाकरेंना जे हवे, तेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाळासाहेबांच्या तोंडून बोलवून घेणार हे उघड झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App