सीबीआयच्या आदेशावरून कारवाई; भारतात आणण्याची तयारी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Mehul Choksi फरार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. हजारो कोटी रुपयांच्या पीएनबी कर्ज घोटाळ्यात भारत त्याचा शोध घेत आहे. भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियमने चोक्सीविरुद्ध कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहुल बेल्जियममधील अँटवर्पमध्ये त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत होता. त्याने तिथे रेसिडेन्सी कार्डही मिळवले होते.Mehul Choksi
असोसिएटेड टाईम्सच्या वृत्तानुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याची विनंती केली. यानंतर तिथल्या प्रशासनाने चोक्सीला ताब्यात घेतले.
चोक्सीची पत्नी प्रीती हिच्याकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. दरम्यान, त्याने बेल्जियमचे ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ देखील मिळवले आणि त्याच्या मदतीने तो त्याच्या पत्नीसोबत राहू लागला. बेल्जियममध्ये जाण्यापूर्वी चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडामध्येही राहत होता असे मानले जाते. १३,५०० कोटी रुपयांच्या पीएनबी कर्ज घोटाळ्याप्रकरणी भारत त्याचा शोध घेत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App