नाशिक : National herald case मध्ये गांधी परिवाराचा बचाव करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आज पत्रकार परिषदेत जे बोलले, त्यात एक “तथ्य” जरूर आहे, पण म्हणून तो मोदी सरकारने केलेला लोकशाही वरचा हल्ला आहे, हे त्यांचे म्हणणे मात्र चूक आहे.Kapil sibal lectureing on democracy proved invalid
वास्तविक National herald case खूप जुनी, म्हणजे 2012 ची. त्यावेळी काँग्रेस प्रणित यूपीए सरकार सत्तेवर होते. त्यानंतरच्या दोन वर्षांनी यूपीए सरकारचा पराभव करत मोदी सरकार सत्तेवर आले. पण National herald case ची फाईल काही लगेच मोदी सरकारने उघडली नाही. ती कोर्टामार्फत टप्प्याटप्प्याने उघडली गेली. पण त्या आधीपासून सुब्रमण्यम स्वामी हे गांधी परिवाराच्या पाठीमागे हात धुवून लागले होते. कपिल सिबल यांनी आपल्या वक्तव्यात सुब्रमण्यम स्वामी यांचेच नाव घेतले आणि त्यापुढे राहून गांधी परिवाराचा बचाव करताना त्यांचा नेमका गुन्हा काय??, असा सवाल केला. त्याचबरोबर केस ओपन होऊन 10 वर्षानंतर अशी कोणती तातडीची निकड भासायला लागली की नॅशनल हेराळच्या 661 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस दिल्ली, मुंबई आणि लखनऊ इथल्या मालमत्तांवर लावायला भाग पडले??, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला.
पण कपिल सिब्बल यांच्या या सवालांपेक्षा त्यांनी पुढे जे वक्तव्य केले, त्यामध्ये जरूर तथ्य आहे, ते म्हणजे काँग्रेसला अशी काही पांगळी करून ठेवायची की तो पक्ष पुन्हा उभाच राहता कामा नये किंवा तो लढाईच्या मैदानात सरळपणे उतरूच शकता कामा नये, अशी मोदी सरकारला व्यवस्था करायची आहे. म्हणूनच सरकारने National herald case मध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई केली. हा लोकशाही वरचा हल्ला आहे, असे कपिल सिब्बल म्हणाले.
कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यातले “तथ्य” फक्त काँग्रेसला पांगळी करण्यापर्यंतच्या मुद्द्यापुरतेच मर्यादित आहे. त्या पलीकडे जाऊन तो लोकशाही वरचा हल्ला आहे वगैरे ही भाषणबाजी आहे. त्यात फारसे तथ्य नाही. कारण मोदी काँग्रेसला पांगळी करणार नाहीत, तर काय मजबूत करणार??, तसेच करण्याची काय मोदींची जबाबदारी आहे?? मोदी काँग्रेसचे नेते नाहीत मोदी भाजपचे नेते आहेत आणि भाजपच्या नेत्यांवर काँग्रेस मजबूत करून ठेवण्याची जबाबदारी कुठल्याच लोकशाही तत्त्वांमध्ये बसत नाही.
त्याही पलीकडे जाऊन फक्त मोदीच काँग्रेसला पांगळी करायला बसलेत, असे मानणेही चूक आहे. कारण मोदी कितीही मोठे राजकीय कर्तृत्ववान नेते असले, तरी काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्षाला पांगळे करणे ही त्यांची एकट्याची राजकीय करतूत असू शकत नाही. कारण त्यांची तेवढी क्षमता नाही. काँग्रेसला पांगळी करण्यामध्ये मोदींपेक्षा जास्त राजकीय करतूत तर काँग्रेस मधून फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांची राहिलीय. मूळ काँग्रेस मधून फुटलेल्या नेत्यांनीच तर त्या पक्षाचे लचके तोडून आपापल्या नव्या काँग्रेसचे भरण पोषण केले. त्यासाठी उगाच नरेंद्र मोदींना किंवा मोदी सरकारला नावे ठेवण्यात काही मतलब नाही. आणि काँग्रेस पांगळी करण्याचे credit किंवा discredit एकट्या मोदींना देण्याचे कारण नाही.
शिवाय काँग्रेस धडधाकट ठेवण्याची किंवा तो पक्ष पुन्हा उभा करण्याची जबाबदारी मुळात अगदी लोकशाही तत्त्वानुसार मोदींवर येतच नाही. कारण मोदी त्या पक्षाचे सदस्यच नाहीत. मग काँग्रेस पक्ष धडधाकट ठेवण्याची जबाबदारी किंवा तो पक्ष उभा करण्याची जबाबदारी आहे कोणाची, तर ती थेट काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आहे. मग ती जबाबदारी इतर नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर किंवा अगदी मोदी सरकारवर ढकलण्यात काय मतलब आहे??
#WATCH | Delhi | On ED carrying out possession proceedings against Associated Journals Limited (AJL), Senior advocate and Rajya Sabha MP Kapil Sibal says, "The original complaint was filed by Subramanian Swamy in 2012. We are now in 2025, 13 years have passed and suddenly, this… pic.twitter.com/5M0GwNe0wS — ANI (@ANI) April 13, 2025
#WATCH | Delhi | On ED carrying out possession proceedings against Associated Journals Limited (AJL), Senior advocate and Rajya Sabha MP Kapil Sibal says, "The original complaint was filed by Subramanian Swamy in 2012. We are now in 2025, 13 years have passed and suddenly, this… pic.twitter.com/5M0GwNe0wS
— ANI (@ANI) April 13, 2025
– money laundering करायला मोदींनी सांगितले का??
National herald case मध्ये money laundering करा. ९० कोटींचे कर्ज वाटप करा आणि ते फिटले नाही म्हणून पैशाची अफरातफर करा, हे सांगायला मोदी कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याच्या घरी गेले नव्हते किंवा काँग्रेस फोडणारे नेते सुद्धा हे बोलायला गांधी परिवाराच्या दरवाजात गेले नव्हते. अशा स्थितीत कायद्याच्या पातळीवर जर कुठली जप्तीची नोटीस कुठे चिकटली असेल, तर तिला कायद्याच्या भाषेत म्हणजे कोर्टात जाऊन उत्तर देणे हे काम केले पाहिजे. त्यासाठी कपिल सिब्बल यांना गांधी परिवाराने नेमले आहे. कदाचित कपिल यांनी कोर्टातले आपले कर्तव्य बजावले देखील असेल, पण त्या पलीकडे जाऊन लोकशाही वरचा हल्ला, वगैरे गैरलागू भाषणबाजी करण्यात त्यांनी पत्रकार परिषदेचा वेळ घालवला. त्यापलीकडे त्यांच्या बोलण्यात फारसे कुठे तथ्य नव्हते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App