Bangladeshi : बनावट कागदपत्रं वापरून पासपोर्ट बनवणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

Bangladeshi

२००२ पासून गुजरातमधील वडोदरा येथे पत्नीसह राहत होता


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Bangladeshi बांगलादेशी नागरिक मोहम्मद शमीम मोहम्मद सत्तार याला बांगलादेशला जाण्यापूर्वी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टसह ताब्यात घेण्यात आले.Bangladeshi

शमीम २००२ पासून गुजरातमधील वडोदरा येथे राहत होता आणि त्याने स्वतःची ओळख अजय दिलीपभाई चौधरी, भारतीय नागरिक अशी करून दिली. सुरुवातीच्या चौकशीत, तो त्याची ओळख आणि कागदपत्रांबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही, त्यानंतर मुंबई पोलिसांना कळवण्यात आले.

पोलिस तपासात असे दिसून आले की शमीम हा मूळचा बांगलादेशचा रहिवासी होता, त्याने यापूर्वी सिंगापूरमध्ये काम करत असताना संगीता चौहान या भारतीय महिलेशी लग्न केले होते. १९९५ मध्ये झालेल्या या लग्नानंतर ते २००२ मध्ये भारतात आले आणि वडोदरा येथे स्थायिक झाले. पत्नी संगीताच्या मदतीने त्याने बनावट कागदपत्रे तयार केली आणि अहमदाबाद पासपोर्ट ऑफिसमधून अजयभाई दिलीपभाई चौधरी यांच्या नावाने भारतीय पासपोर्टही मिळवला.



शमीमने या बनावट पासपोर्टचा वापर करून अनेक वेळा परदेश प्रवास केला आहे, ज्यामध्ये बांगलादेशचाही समावेश आहे. जेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी शमीमला त्याच्या बांगलादेश भेटीबद्दल विचारले तेव्हा तो गोंधळला आणि योग्य उत्तरे देऊ शकला नाही. जेव्हा संशय अधिकच वाढला आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने त्याची खरी ओळख आणि तो बांगलादेशी नागरिक असल्याचे मान्य केले.

शमीमने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्याने १९९२ मध्ये तस्लिमा या बांगलादेशी महिलेशी लग्न केले होते आणि नंतर नोकरीसाठी सिंगापूरला गेला होता. मुंबई पोलिस आता शमीमच्या पार्श्वभूमीचा सखोल तपास करत आहेत. त्याची भारतीय पत्नी संगीता हिची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि तिला लवकरच अटक केली जाऊ शकते.

Bangladeshi national arrested at Mumbai airport for making passport using fake documents

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात