वृत्तसंस्था
हापूड : Mayawati बसप प्रमुख मायावती यांच्या पुतणीने तिच्या पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, हापूरनगर पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये हापूर नगरपालिका अध्यक्ष पुष्पा देवी, त्यांचे पती, मुलगा आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. तिचा विवाह ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पुष्पा देवी यांचा मुलगा विशाल याच्याशी झाला होता.Mayawati
नवरा स्टिरॉइड्स घेत असे
तक्रारीनुसार, सासरच्यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून ५० लाख रुपये रोख, फ्लॅट आणि पक्षाचे तिकीट मागण्यास सुरुवात केली. तसेच पती मोठ्या प्रमाणात बॉडी बिल्डिंगसाठी स्टिरॉइड्स घेत असे ज्यामुळे तो वैवाहिक जीवनासाठी अयोग्य ठरला. या मुद्द्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री सासरे आणि मेहुण्यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिस तक्रारीची दखल घेत नसल्याने न्यायालयात धाव घ्यावी लागली, असेही पिडितेचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App