नाशिक : पवारांच्या “घरात” पवार साहेब दैवत, देशामध्ये पंतप्रधान मोदी नेते मजबूत; अजितदादांच्या गुगलीने पवारांची राष्ट्रवादी घातली तंबूत!!, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पिंपरी चिंचवड मधल्या सत्कार समारंभात हे राजकीय नाट्य घडले.
अण्णा बनसोडेंच्या या सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार भाषण ठोकले. अण्णांचे भरपूर गुणवर्णन केले. पण या भाषणाच्या ओघातच अजित पवार शरद पवारांना “दैवत” म्हणाले. त्याबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय स्फोट झाला. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित करण्याच्या चर्चा माध्यमांनी सुरू केल्या. अजितदादांच्या वक्तव्याच्या बातम्या सगळ्या मराठी माध्यमांनी मोठा गाजावाजा करत दिल्या. पण अजित पवार आपण “घरात” पवार साहेबांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो, असे म्हणाले. यातला “घरात” हा शब्द मराठी माध्यमांनी सोयीस्कर रित्या वगळला, पण अजित पवारांच्या भाषणातला तोच सगळ्यांत महत्त्वाचा शब्द ठरला!! कारण अजितदादांनी पवारांना “घरातले दैवत” मानताना देशात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच मजबूत नेते असल्याचे सांगितले.
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे मजबूत नेते मिळाले. त्यांनी जगात देशाचा मान वाढविला. आपण त्यांना पाठबळ देण्यासाठी उभे राहिले पाहिजे. नुसते तळ्यात मळ्यात करून चालणार नाही. त्यामुळे काहीच कोणाला मिळणार नाही. म्हणून काहीतरी ठाम निर्णय घेतला पाहिजे. आम्ही निर्णय घेऊन मोदी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला चांगले काम करता येत आहे, असे अजितदादा म्हणाले.
अजितदादांच्या या एका वक्तव्यातूनच शरद पवारांची अख्खी राष्ट्रवादी तंबूत घातली. शरद पवारांना त्यांनी फक्त पवार घराण्याचे दैवत ठरविले.
एरवी शरद पवारांचे कट्टर समर्थक पवारांना “अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत” मानतात. तशा मोठमोठ्या जाहिराती वृत्तपत्रांना आणि इतर माध्यमांना देतात. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये मोठमोठी पोस्टर लावतात. त्यावर शरद पवारांचे मोठे फोटो लावून त्यावर मोठ्या अक्षरात “दैवत” शब्द झळकवतात. त्यातून पवारांबरोबरच हे सगळे नेते स्वतःचे ब्रॅण्डिंग करून घेतात.
पण आता खुद्द त्यांच्याच पुतण्याने पिंपरी – चिंचवड मधल्या जाहीर समारंभात भाषण करून शरद पवारांना फक्त “पवारांच्या घरातले दैवत” बनवून ठेवले. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची पंचाईत झाली. अजितदादांवर टीका करावी, तर ते पवारांना “दैवत” म्हणाले, पण “घरातले दैवत” म्हणून पवारांचे महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्त्व एकदम कमी करून त्यांना फक्त पवार घराण्यापुरते मर्यादित करून ठेवले. त्यामुळे शरद पवार आता अखंड किंवा फुटलेल्या राष्ट्रवादीचे देखील “दैवत” उरले नसल्याचे यातून उघड झाले. म्हणून पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची खरी गोची झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App