Tariff war मध्ये अमेरिकेने चीनच्या नाड्या आवळताच चीनला आठवले हिंदी – चिनी भाई भाई!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एरवी सीमा तंट्यामध्ये भारताशी पंगा घेऊन भारतीय भूमीत घुसखोरी करणाऱ्या चीनला अखेर हिंदी – चिनी भाई भाई आठवले. त्याला कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरले. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 104 % टेरिफ लादताच चीन हादरला. चीनने अमेरिकेशी आर्थिक संघर्ष करायचा आव आणला. पण या संघर्षात चीनला हिंदी – चिनी भाई भाई आठवले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर 34 % आयात शुल्क लावलं असून एकूण 104 % आयात शुल्क लावण्याचा इशारा दिला. ट्रम्प सरकारने भारतीय वस्तूंवरही 27 % आयात शुल्क लावलं आहे. अशातच भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते म्हणाल्या, “अमेरिकेने सुरू केलेल्या ‘टॅरिफ वॉर’विरोधात भारत आणि चीनने एकत्र यायला पाहिजे.



चिनी दूतावासाचे प्रवक्त्या यू जिंग यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या टेरिफमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत व चीनने एकत्र आलं पाहिजे. चीन-भारत आर्थिक व्यापारी संबंध परस्पर फायद्यांवर आधारित आहेत. अमेरिका आयात शुल्काचा गैरवापर करत असल्याने आपल्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या अडचणींना तोंड देण्यासाठी विकसनशील देशांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे.”

पण भारत – चीन सीमा तंट्यामध्ये चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली, त्याबद्दल चिनी प्रवक्त्याने चकार शब्दही काढला नाही.

त्या उलट यू जिंग म्हणाल्या, “चीन इकोनॉमिक ग्लोबलायजेशन व मल्टीलेटरलिझमचा (बहुपक्षीयता) समर्थक आहे. चीनने जागतिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मोठं योगदान दिलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत दरवर्षी सरासरी जितकी वाढ होतेय त्या वाढीत चीनचं 30 % टक्के योगदान आहे. जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) केंद्रस्थानी ठेवून बहुपक्षीय व्यापार प्रणालीचं रक्षण करण्यासाठी आम्ही जगाबरोबर काम करत राहू.”

US impose 104 % on china, china demands india’s help

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात