विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अहमदाबाद मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला गेले असताना इकडे कराडमध्ये त्यांच्या कट्टर समर्थक काँग्रेस शहराध्यक्षाने राजीनामा दिला. त्यामुळे पक्षाला मोठा हादरा बसला. Karad congress city president resignation
काँग्रेसचे महाअधिवेशन तीन दिवस गुजरात मध्ये अहमदाबादेत भरत आहे. काँग्रेसची राष्ट्रीय स्ट्रॅटेजी ठेवण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर संजीवनी देऊन मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे सगळे महत्वाचे नेते तिथे विचार मंथन करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य असल्याने ते देखील अहमदाबादेत त्या विचार मंथनात सामील झाले.
पण नेमका हाच राजकीय मुहूर्त साधून कराड काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक प्रशांत चांदे यांनी काँग्रेसच्या राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत चांदे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. पृथ्वीराज बाबांच्या सर्व विधानसभा निवडणुकांच्या वेळी प्रशांत चांदे आघाडीवर असायचे.
पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज बाबांचा दारुण पराभव केला. त्यानंतर कराडमध्ये काँग्रेस पक्षाला घरघर लागली. कराड मधल्या प्रत्येक काँग्रेस नेत्याला आणि कार्यकर्त्याला आपल्या राजकीय भवितव्याची चिंता वाटायला लागली. त्यातूनच प्रशांत चांदे यांचा आज राजीनामा आला. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App