नाशिक : ट्रम्प टेरीफ मुळे भारतात आज ब्लॅक मंडे आला. शेअर बाजार धडाधड कोसळून ब्लड बाथ झाला. रिलायन्स पासून टाटा पर्यंत सगळे शेअर्स कोसळले. गुंतवणूकदारांचे लाखो करोड रुपये पाण्यात गेले. ट्रम्प टेरीफमुळे जगावर मंदीची छाया पसरली. त्यातून अमेरिकेत देखील असंतोष पसरून ट्रम्प प्रशासनाविरुद्ध १५० पेक्षा जास्त संघटनांचे मोर्चे निघाले. ट्रम्प टेरीफ मुळे जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था ढवळून निघाल्या. यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला काही तोशिस लागली, तर त्यात फार काही विशेष घडले असे नाही.Rahul Gandhi says that India’s economy
पण भारतात आज ब्लॅक मंडे आला. शेअर बाजार धडाधड कोसळून ब्लड बाथ झाला. त्यामुळे अचानक राहुल गांधींना भारतीय अर्थव्यवस्थेविषयी “जाग” आली आणि त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर दणकेबाज इंग्लिश मध्ये एक ट्विट करून भारताची अर्थव्यवस्था resilient, production-based that works for all indians, अशी बनवावी लागेल असा उपदेश केला. राहुल गांधींच्या “या” उपदेशामुळे सगळे भारतातले अर्थतज्ञ विशेषतः मोदी सरकार “घाबरले.” आता राहुल गांधी अर्थतज्ञ या नात्याने मोठा “अर्थचारुचंद्र ग्रंथ बिंथ” पाडतात का काय??, अशी भीती सगळ्यांना निर्माण झाली.
वास्तविक भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधींनी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करणे किंवा काही सूचना करणे, यात काही येत नाही. पण शेअर बाजार कोसळला या एकमेव कारणासाठी ते जर भारताची अर्थव्यवस्था resilient, production-based that works for all Indians, अशी बनवावी लागेल, असे म्हणत असतील, तर गेल्या 75 वर्षांच्या इतिहासामध्ये 50 पेक्षा जास्त वर्ष सत्तारूढ असलेल्या काँग्रेसला “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी विरोध केला होता??, हा सवाल राहुल गांधींना तोंडावर विचारावा लागेल.
राहुल गांधींची काँग्रेस 50 पेक्षा जास्त वर्षे देशाच्या सत्तेवर होती. त्यांचे पणजोबा, आजी आणि वडील भारताचे पंतप्रधान होते. त्यामुळे भारताच्या सगळ्या प्रगतीचे credit जसे त्यांच्या पणजोबा, आजी आणि वडील यांना जाते, तसेच भारतीय अर्थव्यवस्था resilient, production-based that works for all Indians, अशी न बनविण्याचे discredit देखील त्यांना जाते. मग राहुल गांधी त्याविषयी काय बोलले नाहीत??, हा खरा सवाल आहे.
याच राहुल गांधींच्या काँग्रेस प्रणित UPA सरकारचे अर्थविषयक सल्लागार आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी तर भारताची अर्थव्यवस्था production based पेक्षा ती सेवा उद्योगावर आधारित म्हणजे service based असावी, असे मत व्यक्त केले होते. Service हा भारताचा usp आहे, तर production हा चीनचा usp आहे, असा “शोध” त्यांनी लावला होता. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये याच रघुराम राजन यांनी राहुल गांधींची मुलाखत घेतली होती. मग त्यावेळी राहुल गांधींनी रघुराम राजन यांना भारताची अर्थव्यवस्था service based नको, तर production based हवी आणि ती resilient हवी, असा उपदेश का केला नाही??, असा सवाल देखील राहुल गांधींना विचारायला नको का??
राहुल गांधींच्या पणजोबा, आजी आणि वडिलांनी तर समाजवादी मॉडेल स्वीकारून भारताची अर्थव्यवस्था लाल फितीमध्ये अडकवली होती. ती लाल फीत सोडताना नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारांची दमछाक झाली होती. त्यावेळी राहुल गांधी यांच्या परिवाराच्या समर्थकांनी त्या दोन्ही नेत्यांना अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठोकून काढले होते. “गांधी” समर्थकांपैकी कोणीही त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था resilient आणि production based असावी असा उपदेश त्यांना केला नव्हता. पण आज मोदी सरकार सत्तेवर असल्यामुळे राहुल गांधींना अचानक भारताची अर्थव्यवस्था resilient आणि production based करावीशी वाटू लागली आहे. याचे रहस्य काय असावे बरे…??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App