शिवराजसिंह चौहान यांच्या ताफ्यातील गाडी उलटली!

Shivraj Singh

अपघातात तीन पोलिस जखमी ; जाणून घ्या, अधिकची माहिती


विशेष प्रतिनिधी

सिहोर : मध्य प्रदेशातील सिहोरमधून मोठी बातमी आली आहे. येथे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ताफ्याचे एक वाहन उलटले आहे. या अपघातात तीन पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवराज सिंह चौहान भोपाळहून देवासला जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला आष्टा पोलीस स्टेशन परिसरातील बेदाखेडी गावाजवळ अपघात झाला. ताफ्यातील वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि उलटले, त्यात तीन पोलिस जखमी झाले.



अपघातानंतर जखमी पोलिसांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी भोपाळहून देवास जिल्ह्यातील खाटेगाव संदलपूरला जात होते. त्यांचा ताफा आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेदाखेडी गावाजवळ पोहोचताच, त्यांच्या ताफ्यातील एक वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि उलटले. या अपघातात तीन पोलिस जखमी झाले, ज्यांना तात्काळ सिहोर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये एएसआय एसपी सिमोलिया, नीरज शुक्ला आणि आकाश अटल यांचा समावेश आहे.

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी देवास जिल्ह्यातील खाटेगाव येथे पोहोचले. गुजरातमधील बनासकांठा येथील डीसा येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पंकज यांना शिवराज यांनी श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर ते संदलपूरला पोहोचले आणि ९ मृतांच्या कुटुंबियांनाही भेटले.

vehicle in Shivraj Singh Chouhans convoy overturned

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात