Mamata Banerjee ममता बॅनर्जी सरकारचा हिंदू विरोधी “प्रलाप”; जादवपूर विद्यापीठात इफ्तार पार्टीला परवानगी, रामनवमीला नकार!!

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांचा हिंदू विरोधी प्रलाप पुन्हा एकदा समोर आला. त्यांच्या सरकारने जादवपूर विद्यापीठात इफ्तार र पार्टी साजरी करायला परवानगी दिली, पण रामनवमी साजरी करायला नकार दिला आहे. रामनवमी म्हणजे उद्या कुलगुरू विद्यापीठ कॅम्पस मध्ये हजर नसतील असे अजब कारण या नकाराला दिले आहे.

याआधी जादवपूर विद्यापीठात रमजान महिन्या दरम्यान इफ्तार पार्टी करायला ममता बॅनर्जी सरकारच्या प्रशासनाने परवानगी दिली होती त्यावेळी कुलगुरू कॅम्पस मध्ये हजर आहेत की नाही हे पाहिले नव्हते. त्याचबरोबर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI संघटनेने दोन राजकीय कार्यक्रम गेल्या १५ दिवसांत विद्यापीठ परिसरात घेतले. या दोन्ही कार्यक्रमांना ममता सरकारने परवानगी दिली. पण 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या रामनवमी उत्सवास मात्र परवानगी नाकारली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 28 मार्च रोजी विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यापीठाच्या आवारात शांततेत रामनवमी साजरी करण्याची परवानगी मागितली होती त्यावेळी विद्यापीठाने कुठलेच उत्तर दिले नव्हते मात्र आज रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे ५ मार्च 2025 रोजी विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या आवारात रामनवमी साजरी करता येणार नाही कारण कुलगुरू विद्यापीठात उपस्थित नाहीत, असे लेखी उत्तर कळविले. यातील ममता बॅनर्जी सरकारचा हिंदू विरोधाचा विद्रूप चेहरा समोर आला.

Mamata Banerjee allows iftar party but opposed ramnavami celebrations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात