विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय वातावरणाचे भवितव्य ठरवणाऱ्या waqf सुधारणा विधेयकावरील चर्चेच्या वेळी (शप) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार राज्यसभेत गैरहजर राहिले. त्यांनी चर्चेमध्ये आणि मतदानात देखील भाग घेतला नाही. मात्र हे तेच शरद पवार आहेत, ज्यांनी 2024 मध्ये मुस्लिम शिष्टमंडळाला आम्ही waqf संशोधन बिल संसदेत पास होऊ देणार नाही, गर्जना करणारे आश्वासन दिले होते.
Waqf संशोधन बिलावर काल लोकसभेत मतदान झाले त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले, पण त्यांच्या लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या विरोधात भाषण करणे टाळले. त्यांनी स्वतः ऐवजी खासदार निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडायला सांगितले. पण त्या स्वतः लोकसभेमध्ये चर्चेच्या वेळी निदान हजर तरी राहिल्या.
त्या उलट शरद पवार काल आणि आज संसदेत हजरच राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी राज्यसभेमध्ये waqf सुधारणा विधेयकावर चर्चेत सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बाजू खासदार फौजिया खान यांनी मांडली. शरद पवार हे मुंबईतून उद्या दिल्लीत दाखल होऊन संसदेच्या कामकाजात सहभागी होतील, अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App