हिंदुत्वाच्या नावाने उद्धव सेनेचे भलतेच चाळे; अजितदादांचे खासदार waqf बिलाला पाठिंबा देऊन मोकळे झाले!!

Waqf amendment bill

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंदुत्वाच्या नावाने उद्धव सेनेने दिल्लीत भलतेच चाळे केले. मुंबईत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्या चाळ्यांना पाठिंबा दिला, पण अजित पवारांचे खासदार मात्र मुकाटपणे waqf सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मोकळे झाले.Ajit Pawar NCP supports Waqf amendment bill

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने waqf सुधारणा विधेयकाच्या विरोधात लोकसभेत मतदान केले. संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजपवर दुगाण्या झोडणारे भाषण केले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाजपवर त्याच दुगाण्या झोडल्या. पण ठाकरे सेनेने हिंदुत्व सोडले नसल्याच्या दिल्ली आणि मुंबईत बाता मारल्या. संजय राऊत यांनी तर तुमच्या मनात जीना बसलाय, तुम्हाला हिंदू पाकिस्तान बनवायचेय हिंदू मुल्लांनी मला शिकवू नये, अशा एका चढ एक बाता मारल्या पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी भाजपच्या सत्तेच्या बडग्याला घाबरून मुकाटपणे waqf सुधारणा कायद्याला पाठिंबा दिला.



खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेमध्ये मोदी सरकारने मांडलेल्या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. सुनेत्रा पवारांनी राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तसाही विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, कारण महाराष्ट्रात नुसत्या राजकीय तत्वांच्या गप्पा मारून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसता येणार नाही. भाजपच्या मर्जीनुसार त्या सत्तेचे लाभ आपल्याला घेता येणार नाहीत, याची भीती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी waqf सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन महाराष्ट्रातील सत्तेची वळचण टिकवून धरली.

Ajit Pawar NCP supports Waqf amendment bill

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात