वृत्तसंस्था
मुंबई : Disha Salian सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. या याचिकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर अनेकांविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात.Disha Salian
दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या वतीने वकील नीलेश ओझा हे उच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. दिशा सालियनचे वडील सतीश यांच्या याचिकेवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांनी हे प्रकरण योग्य खंडपीठासमोर ठेवण्याचे निर्देश रजिस्ट्री विभागाला दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
सतीश सालियन यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांना न्याय हवा आहे, तो न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडून मिळू शकतो. दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा राजीनामा घेण्याची मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली होती. तसेच संजय निरुपम यांनीही त्यांच्यावर टीका केली होती.
परमवीर सिंग हा या प्रकरणाचा मास्टरमाइंड
८ जून २०२० रोजी मालाडमधील एका अपार्टमेंटच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपास करून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. वकील ओझा म्हणाले, परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी ते खोटे बोलले. एनसीबीच्या तपासात आदित्य ठाकरे ड्रग्जच्या व्यापारात सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे. एफआयआरमध्येही याचा उल्लेख करण्यात आला आहे. या कटात काही वरिष्ठ पोलिस अधिकारीही सहभागी होते, असे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App