विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या waqf सुधारणा विधेयकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतल्या चर्चेत सहभाग नोंदवला. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविण्याचे विधेयक मांडताना अमित शाह यांनी केलेल्या भाषणाची स्फोटक पुनरावृत्तीच आज लोकसभेत पाहायला आणि ऐकायला मिळाली. Waqf board ने देशभरातली मंदिरे, गुरुद्वारे आणि चर्चेस यांच्या मालमत्ता कशा हडपल्या याचे सविस्तर वर्णन अमित शाह यांनी आपल्या भाषणात केले.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले. त्यावर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू राहिली. या दरम्यान रिजिजू यांनी, विरोधी पक्षांकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला आहे. तर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने वक्फ दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. याचबरोबर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनीही याला विरोध केला. मात्र, गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण ताकदीने त्याचे समर्थन केले.
अमित शाह म्हणाले :
माझ्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याने मांडलेल्या विधेयकाचे मी समर्थन करतो. दुपारी १२.०० वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी लक्षपूर्वक ऐकत आहे. मला वाटते की अनेक सदस्यांचे खरोखरच किंवा राजकीय कारणांमुळे अनेक गैरसमज आहेत.
पण देशभरात विविध ठिकाणी मंदिरे गुरुद्वारे आणि चर्चेस यांच्या हजारो हेक्टर मालमत्ता waqf board ने हडपल्याची उदाहरणे समोर आहेत. महाराष्ट्रात बीडमधल्या कंकलेश्वर मंदिराची १२ एकर जमीन वक्फ बोर्डाने हडपली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडाणगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला.
२०१३ मध्ये, मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी वक्फ बोर्डाला एका रात्रीत अतिरेकी स्वरूप देण्यात आले. यामुळे, दिल्लीतील १२३ सरकारी मालमत्ता वक्फला देण्यात आल्या. दिल्ली वक्फ बोर्डाने उत्तर रेल्वेची जमीन वक्फच्या नावावर घोषित केली. हिमाचल प्रदेशात, वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर मशिदी बांधण्यात आल्या. तामिळनाडूमध्ये, १५०० वर्षे जुन्या मंदिराची जमीन वक्फ बोर्डाने हडपली. कर्नाटकच्या विजयपूर मध्ये वक्फ मालमत्तेवर फाईव्ह स्टार हॉटेल उभे केले, ते फक्त १२००० रुपये वार्षिक भाड्याने दिले. आसाम मध्ये ६०० हेक्टर जमीन वक्फ बोर्डाच्या लोकांनी गिळंकृत केली. केरळ मध्ये ६०० ख्रिश्चन कुटुंबांच्या मालमत्ता वक्फ बोर्डाच्या लोकांनी हडपल्या.
वक्फ शब्दाचा अर्थ
वक्फचा अर्थ आणि त्याचा इतिहास स्पष्ट करताना गृहमंत्री अमित शाहा म्हणाले की, “वक्फ हा एक अरबी शब्द आहे, ज्याचा उल्लेख काही हदीसांमध्ये आहे.” त्यांनी सांगितले की, वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावाने मालमत्ता दान करणे आणि त्याची प्रथा इस्लामचे दुसरे खलीफा उमर यांच्या काळात सुरू झाली.
वक्फशी संबंधित धार्मिक कार्यात गैर-मुस्लिमांना समाविष्ट केले जाणार नाही. परंतु, काही लोक या मुद्द्यावर गैरसमज पसरवून आपली व्होट बँक सुरक्षित करण्यासाठी राजकारण करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, वक्फ बोर्ड आणि वक्फ कौन्सिलमधील बिगर मुस्लिम सदस्य केवळ काम योग्यरित्या होत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी असतील.
वक्फ मध्ये दानातली जमीन ही स्वतःची असली पाहिजे. सरकारी किंवा इतरांची मालमत्ता वक्फ म्हणून कोणाला दान करता येणार नाही असेच मुळात इस्लाम मध्ये नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App