विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 370, ट्रिपल तलाक, भारतीय न्याय संहिता आदी महत्त्वाच्या विधेयकांनंतर केंद्रातल्या मोदी सरकारने संसदेत आणलेल्या Waqf board सुधारणा विधेयकावर लोकसभेत सगळ्या पक्षांचे लोकसभेतले गटनेते बोलले, पण राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी मात्र चर्चेतून पलायन केल्याचेच चित्र आज दिसले.
लोकसभेत Waqf सुधारणा विधेयकाच्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव, उबाठा शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते श्रीकांत शिंदे, द्रविड मुन्नेत्र कळघमचे गटनेते ए. राजा, तृणमूल काँग्रेसचे गटनेते सुगत राय, तेलगू देशमचे गटनेते श्रीकृष्ण देवरायलू, जनसेना पक्षाचे गटनेते तेंगला श्रीनिवास, जेडीयूचे गटनेते लल्लन सिंह हे सर्वजण बोलले. त्यांनी आपापली मते आग्रहाने लोकसभेमध्ये मांडली. त्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपापली विशिष्ट भूमिका सदनात समजावून सांगितली.
या अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चेमध्ये काँग्रेसकडून लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई यांनी बाजू मांडली. त्यानंतर ज्येष्ठ खासदार वेणुगोपाल हे देखील बोलले. परंतु, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी या चर्चेमध्ये बोलले नाहीत. राहुल गांधी काही काळ चर्चेच्या दरम्यान सदनामध्ये हजर होते, पण त्यांनी संबंधित विधेयकावर तोंड उघडले नाही. प्रियांका गांधी सदनामध्ये आज दिसल्या नाहीत. वंचित बहुजन आघाडीने या मुद्द्यावर राहुल आणि प्रियांका गांधी यांना चिमटे काढले.
त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया सुळे आज दिवसभर लोकसभेत हजर होत्या, पण गटनेते पदावर असून देखील त्या waqf सुधारणा विधेयकावर राष्ट्रवादीकडून बोलल्या नाहीत, तर तरुण खासदाराला आम्ही पक्षातर्फे संधी देतो, या नावाखाली त्यांनी खासदार निलेश लंके यांना आज बोलायला लावले.
एरवी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते छोट्यातल्या छोट्या विषयांवर संसदेत आणि संसदेबाहेर बोलत असतात. परंतु, waqf board सुधारणा या देशहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांनी लोकसभेमध्ये तोंडही उघडले नाही. चर्चेच्या पहिल्या दिवशी तरी त्यांनी त्यापासून पलायन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App