Trump : ट्रम्प यांचा भारताकडे कर कपातीचा आग्रह, कृषी उत्पादने विक्रीचे ध्येय: 4 लाख कोटींची तूट

Trump

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था : Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रेसिप्रोकल टेरिफ (जशास तसे शुल्क) बुधवारपासून लागू होणार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी २ एप्रिल हा दिवस लिबरेशन डे (स्वातंत्र्य दिन) म्हणून घोषित केला. टेरिफच्या पूर्वसंध्येला त्यांनी भारत अमेरिकी उत्पादनांवरील उच्च कर कमी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, भारताने हे आधीच करायला हवे होते. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प भारतीय कृषी क्षेत्रात अमेरिकी कंपन्यांची एंट्री करण्याच्या प्रयत्नात आहेत.Trump

अमेरिका सध्या भारतासोबत सुमारे ४ लाख कोटी रुपयांचा व्यापार तोटा सहन करत आहे. तो भरून निघण्यासाठी अमेरिका आता भारताने कृषी टेरिफ कमी करावा, या मुद्द्यावर अडून बसली आहे. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलीन लॅविट यांनी सांगितले की, भारत अमेरिकन कृषी उत्पादनांवर १०० टक्के टेरिफ लावतो. काही युरोपीय देश आणि जपान अमेरिकन कृषी उत्पादनांवर सुमारे ७०० टक्के टेरिफ लावतात. ३ एप्रिलपासून ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या कार व कार पार्ट्सवर २५% टेरिफची घोषणा केली. दरम्यान, केंद्रीय वाणिज्यमंत्री जितिन प्रसाद म्हणाले, भारतीय टेरिफ धोरण व्यापार वाढवणे आणि देशांतर्गत उद्योजकांना संरक्षण देणे हे आहे.



ट्रम्प टेरिफला उत्तर… चीन म्हणाला आम्ही भारताकडून जास्त उत्पादने घेऊ

चीनने म्हटले, भारताकडून ट्रेड बॅलन्स ठीक करू

ट्रम्प टेरिफला उत्तर म्हणून चीनचे राजदूत झू फियांग म्हणाले, व्यापार असंतुलन सुधारण्यासाठी भारताकडून अधिक उत्पादनांची आयात करू. सध्या भारत चीनकडून अधिक आयात करतो.

वॉशिंग्टन सफरचंद, चिकन लेग पीस आणि बेबी काॅर्न भारतीय बाजारात खपवू पाहत आहेत ट्रम्प
ट्रम्प भारतीय कृषी क्षेत्रातील टेरिफ कमी करू पाहत आहेत. यामुळे अमेरिकन कृषी, डेअरी व पोल्ट्री उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठा खुल्या होतील. अमेरिकेवरील भारतीय टेरिफ डब्ल्यूटीओच्या धोरणानुसार आहे. ते विकसनशील देशांना विकसित देशांच्या तुलनेत अधिक टेरिफ लावण्याची परवानगी देते.
फळे, पिके : गहू, बेबी कॉर्न (छोटा मका) आणि वॉशिंग्टन सफरचंदांचे अमेरिकेत बंपर उत्पादन आहे. अमेरिका वॉशिंग्टन सफरचंदांची भारतीय बाजारपेठेत एंट्री करू इच्छित आहे. सध्या भारत त्यावर ५० %टेरिफ लावतो, परंतु अमेरिकेला तेे १५% हवेय.

अमेरिका प्रसिद्ध भारतीय आंब्यांना प्रवेश देत नाही. कधी जीआय टॅग कधी कीटकनाशकांना लो टेरिफ न लावण्याचे कारण सांगत आला आहे.

पोल्टी-मांस : अमेरिकेत चिकनची मागणी जगभरात सर्वाधिक आहे. परंतु लेग पीस अमेरिकींना आवडत नाहीत. अमेरिका लेग पीस नष्ट करतो. ते तो भारतात विकायला इच्छुक आहे. तुर्की आणि आशियाई देशांत याला ‘बुश लेग’ म्हणतात. हे बाजार चिकन लेग पीसचे मोठे आयातकार आहेत.

भारत स्थानिक पोल्ट्री शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पोल्ट्री टेरिफ ४५% पेक्षा कमी करू इच्छित नाही.

कॅश क्रॉप : अमेरिकेत कापसाचे बंपर उत्पादन होते. तिथे १६ हजार शेतकरी आहेत आणि सरासरी क्षेत्र ४०० हेक्टरवर आहे. भारतात कापसाच्या शेतीत ९८ लाख शेतकरी गुंतलेले आहेत. अमेरिकन कापसावर सध्या भारत ३५% टेरिफ लावतो. अमेरिका हे कमी करून ५% च्या पातळीवर आणू पाहताहेत.

अमेरिकेत प्रत्येक शेतकऱ्याला २६ लाख रुपयांची सबसिडी तर भारतात ६ हजारांची सबसिडी आहे

Trump urges India to cut taxes, aims to sell agricultural products: deficit of Rs 4 lakh crore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात