Sudhir Mungantiwar माझ्यासारख्याला तुम्ही ओळखलेच नाही म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळल्या नाराजीच्या चर्चा

विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : मी कुठेही नाराज नाही, माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकले नाहीत, म्हणत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत.  Sudhir Mungantiwar

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याच्या चर्चा हाेत आहेत. मंत्रिमंडळातून डावलल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. चंद्रपुरात केलेल्या भाषणावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीचे तख्त राखायचे असतील तर चंद्रपूरला सोबत घेऊन जावं लागेल, असे विधान केले. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाला. आता या चर्चेवर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यावर स्पष्टीकरण देताना मुनगंटीवार म्हणाले, हे अर्धवट डोक्यातून निघालेलं इंटरप्रिटेशन आहे. भाषण काय होतं की विकासादरम्यान कुठेही या जिल्ह्याला पैसे कमी पडू नये. विकासाला पैसे देताना मी सांस्कृतिक मंत्री म्हणून नाट्यगृहाची मागणी या गावाने केली आहे. त्यासाठी पैसे कमी पडू देऊ नका. कारण मी राज्यगीत केलेलं आहे. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा…पण महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखत असताना चंद्रपूर जिल्हा उणे करु नका. चंद्रपूर जिल्ह्याला मायनस करु नका.

सुधीर मुनगंटीवार त्यांच्या चर्चेत असलेल्या भाषणात म्हणाले हाेते की, दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल

Sudhir Mungantiwar dismissed the talk of displeasure saying that you have not known someone like me

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात