विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूर मध्ये येऊन संघस्थळी डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट दिली. तिथे त्यांनी आद्यसरसंचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुष्पांजली अर्पित केली. मोदींच्या या संघ स्थानाच्या भेटीवरून उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज “जावईशोध” लावला. मोदी आणि संघ यांचे एकूण संबंध लक्षात घेता, मोदींचा पुढचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातला असेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. मात्र, मोदींचा वारसदार शोधायची वेळच अजून आलेली नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मोदी काल संघ स्थानावर आले. संघात नेहमी बंद दाराआड बैठका होत असतात. त्यांच्यातल्या चर्चा बाहेर येत नाहीत, पण तरी देखील काही संकेत असतात. त्यानुसार पंतप्रधान मोदींचा पुढचा राजकीय वारस महाराष्ट्रातला असेल. संघाला हवी असणारी व्यक्तीच या पुढची भाजपची राष्ट्रीय अध्यक्ष असेल.
मोदी १० – ११ वर्षांत नागपूरच्या संघ स्थानावर आले नाहीत. पण भाजपला संघाची गरज नाही, असे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. याचा अर्थ ती मोदींची भूमिका होती. त्यानंतर मोदींना नागपूरला स्मृती स्थळावर यावे लागले. याचा नीट अर्थ समजून घ्यावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांच्या हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारस नियमांची अजून वेळ आलेली नाही. मोदीच 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील. त्यानंतर देखील ते पंतप्रधान राहावेत असेच आमचे सगळ्यांचे मत आहे. वडील हयात असताना त्यांचा वारसदार शोधणे ही मोगली मानसिकता आहे. असला प्रकार भारतीय मानसिकतेत नाही, असा टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App