कुणाल कामरा विरोधात पोलिसांनी दाखल केले आणखी तीन गुन्हे; पण आता असदुद्दीन ओवैसी त्याच्या मागे उभे!!

Asaduddin Owaisi supports Kunal kamra

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन काव्य करून मुंबईतून पळून गेलेल्या कुणाल कामराविरुद्ध खार पोलिसांनी आणखी तीन गुन्हे दाखल केले. जळगावचे महापौर तसेच नाशिक मधील एक व्यवसायिक आणि अन्य दुसरा व्यवसायिख यांच्या तक्रारींच्या आधारे खार पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले. पण मद्रास हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवलेल्या कुणाल कामाच्या पाठीशी आता खासदार असदुद्दीन ओवैसी उभे राहिले.

कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर झाला असला तरी मुंबई पोलिसांनी त्याच्या विरोधातली कायदेशीर कारवाई थांबवलेली नाही. त्याला मुंबई पोलिसांनी दोन समन्स पाठवली. पण तो चौकशी आणि तपासाला हजर राहिला नाही. उलट मद्रास हायकोर्टात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यामध्ये आणखी तीन गुन्हे दाखल केले.

पण आता कुणाला कामराच्या बाजूने खासदार असदुद्दीन ओवैसी उभे राहिले. कुणाल कामराने कॉमेडी केली. तो स्टँड अप कॉमेडियन आहे. तो राजकारणी नाही. त्याला निवडणुका लढवायच्या नाहीत. त्याने स्टँड अप कॉमेडी करताना एकनाथ शिंदे यांचे नाव देखील घेतले नाही, तरी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्सनल लेवल ला ती टीका घेऊन कुणाच्या विरोधात कारवाई केली, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एक व्यक्ती प्रॉफेट मोहम्मद यांच्या विरुद्ध बरळला, तरी त्याच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत एकनाथ शिंदे यांनी केली नव्हती, असे टीकास्त्र असदुद्दीन ओवैसी यांनी सोडले. महाराष्ट्र सरकार दुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला.

Asaduddin Owaisi supports Kunal kamra

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात