विशेष प्रतिनिधी
मुंबई : हातात लाल संविधान घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर “गद्दार” विडंबन काव्य करून मुंबई बाहेर पळून गेलेल्या लाल संविधानी कुणाल कामराची फाटली म्हणून त्याने अटकपूर्व जामीन साठी मद्रास हायकोर्टात धाव घेतली. कुणाल कामराने मद्रास हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीनासाठी वकिलामार्फत अर्ज दाखल केला.
मी वेल्लूपुरम, तामिळनाडूचा रहिवासी आहे. पण मी मुंबईत गेलो, तर पोलीस मला अटक करतील. शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. हे सर्व पाहून मला अटकपूर्व जामीन द्यावा, अशी याचिका कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात दाखल केली.
कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विडंबन काव्य सादर केले. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी हॅबिटॅट स्टुडिओ फोडला, पण त्यावेळी कुणाल कामराला तिथे नव्हता. तो मुंबईतून पांडेचरीला पळून गेला. त्याने फोन स्विच ऑफ केला. नंतर तो टप्प्याटप्प्याने वेगवेगळी विडंबन काव्ये आपल्या सोशल मीडिया हँडलवर टाकत राहिला.
या दरम्यान कुणाल कामराने आविष्कार स्वातंत्र्याच्या भरपूर बाता मारल्या. त्याने टी सिरीज कंपनीला डिवचले. मेन स्ट्रीम मीडियाला नावे ठेवली. डावे लिबरल लोक त्याच्या पाठीशी उभे राहिले. जया बच्चन यांच्यासारख्या बॉलिवूडकरांनी त्याला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा कुणाल कामराला उचलून धरले, पण एवढा मोठा पाठिंबा मिळाल्यानंतर देखील कुणाल कामराने उघडपणे बाहेर यायची हिंमत केली नाही. कुणाला कामराला टायर मध्ये घालून थर्ड डिग्री देणार, असा दम शंभूराज देसाई यांनी भरल्याबरोबर त्याची “फाटली” आणि त्याने लपून राहून वकिलांमार्फत मद्रास हायकोर्टात धाव घेतली. त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App