नाशिक : “लाल संविधानी” कुणाल कामराचा “केजरीवाल” होत चाललाय; कायद्याच्या जाळ्यात येण्यापूर्वी मासा फडफडत राहिलाय!! अशीच कुणाल कामराची अवस्था होत चालली असल्याचे दिसते.
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विडंबन काव्यातून डिवचल्यानंतर मुंबईतले वेगवेगळे “एपिसोड” झाले. त्यात शिवसैनिक भडकले. त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओची “वाट” लावली. क्रिया झाल्यावर प्रतिक्रिया येणारच असे म्हणून एकनाथ शिंदेंनी त्याचे समर्थन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला कायद्यानुसार शिक्षा करू, असे सांगितले, पण या सगळ्या घडामोडी दरम्यान कुणाल कामरा मुंबईतून निसटला आणि त्याने पांडिचेरी गाठल्याचे बोलले गेले. त्याने आपला फोन स्विच ऑफ केला. पण तो सोशल मीडियावर मात्र टप्प्याटप्प्याने वेगवेगळी विडंबन काव्ये टाकत राहिला. यातून त्याने एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टार्गेट केले.
मात्र याच दरम्यान कुणाल कामराभोवती कायद्याचा कचाटा आवळत चालला. मुंबई पोलिसांनी त्याला समन्स पाठविले. कुणाल कामराने त्या समन्सला हजर राहण्यासाठी एका आठवड्यातची मुदत द्या, असे वकिलामार्फत उत्तर पाठवले. याच दरम्यान त्याच्याभोवती जया बच्चन + उद्धव ठाकरे आणि अन्य लिबरल लोकांचा जमावडा वाढला. अगदी मनसेच्या नेत्यांनी देखील त्याच्या विडंबन काव्याचे समर्थन केले, तरी देखील कुणाल कामरा समोरून येऊन कायद्याशी लढला नाही किंवा त्याने पोलिसांच्या चौकशीला देखील सामोरे जायचे धैर्य दाखवले नाही. टी सिरीज कंपनीने कॉपीराईटच्या मुद्द्यावरून त्याला घेरल्याबरोबर त्याने सोशल मीडिया अकाउंट वरच तुम्ही कुणाचे हातातले बाहुले बनून खेळू नका, असे सांगत टी सिरीज कंपनीलाच टार्गेट केले.
पण हे सगळे कुणाल कामराने बाहेर येऊन उघडपणे करायचे धैर्य दाखवले नाही, तर कुणाल कामरा लपून राहिला. तो उघडपणे समोर आलाच नाही. आपण तामिळनाडूत राहत असल्याच्या बाता त्याने मारल्या, पण प्रत्यक्षात त्याचे लोकेशन तामिळनाडूतले आढळले नाही. याच दरम्यान कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा समान पाठवले. पण तो त्या समन्सनंतर देखील चौकशीला समोरा आला नाही. कुणाला कामराची ही सगळी कृती तो “अरविंद केजरीवाल” होत चालल्याचे निदर्शक ठरले.
– केजरीवालांना ७ समन्स
दिल्लीतला दारू घोटाळा उघडकीस येऊन त्यात तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव आल्यानंतर ईडी आणि पोलिसांनी त्यांच्याभोवती असाच टप्प्याटप्प्याने फास आवळला होता. केजरीवालांना पोलिसांनी अनेकदा चौकशी आणि तपासाला समोर येण्यासाठी समन्स पाठवली. ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी देखील केजरीवाल यांना अनेक समन्स पाठवली, पण केजरीवाल कुठल्याही समन्स नंतर चौकशी किंवा तपासाला उघडपणे सामोरे आले नाहीत. उलट त्या कालावधी दरम्यान ते सतत मोदी सरकारलाच घेरत राहिले. मोदी सरकार कसे हुकूमशाह आहे, एकाधिकारशाहीवादी आहे वगैरे बाता मारत राहिले, पण त्यांनी कायद्याच्या चौकशीला उघडपणे सामोरे जाण्याचे धैर्य दाखवले नाही. दिल्लीच्या दारू घोटाळ्यात ईडीने केजरीवाल यांना ७ समन्स बजावली, तरी देखील ते छातीठोकपणे चौकशी आणि तपासाला सामोरे जाण्याची हिंमत करू शकले नाहीत. शेवटी हायकोर्टाच्या आदेशामार्फत ईडीने केजरीवालांना अटक करून त्यांना कोर्टात हजर केले होते, तरी देखील केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही किंवा मोदी सरकार विरुद्ध आगपाखड करणे थांबविले नाही.
या सगळ्याचा परिणाम दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीवर झाला आणि दिल्लीच्या दारू घोटाळ्यात केजरीवाल यांच्या प्रभावाखालचे आम आदमी पार्टीचे सरकार वाहून गेले. कुणाल कामरा देखील असाच “केजरीवाल” व्हायच्या बेतात टप्प्याटप्प्याने येऊ लागलाय. पोलिसांनी दोन समन्स बजावून देखील तो छातीठोकपणे चौकशी आणि तपासाला सामोरा न येता बिळात लपून राहून मोदी सरकारवर हल्लाबोल करतोय. त्यापलीकडे खऱ्या अर्थाने कायद्याला सामोरे जाण्याचे त्याच्यात धैर्य दिसत नाही. या सगळ्या प्रकरणात कुणाल कामराची सत्ता वगैरे जायची शक्यता नाही. कारण तो सत्ताधारी नाही आणि तेवढा कर्तृत्ववान देखील नाही. कायद्याच्या जाळ्यात येण्यापूर्वी मासा फडफडतोय यापेक्षा कुणाल कामराची फारशी किंमत नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App