विशेष प्रतिनिधी
मुंबई : “लाल संविधानी” कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विडंबनातून टार्गेट केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्याच्याविरुद्ध जोरदार मोर्चा उघडला. त्यामुळे तो पांडेचरीत पळून गेला. तिथून त्याने पुन्हा वेगळे विडंबन काव्य रचून शिवसेनेला डिवचले, पण आज एकनाथ शिंदेंनी मात्र विधान परिषदेत तुफान फटकेबाजी करून कुणाल कामरा आणि त्याचे आका त्यांना झोडपून काढले.
आमच्यावर कोणी काव्य केले म्हणून काही बिघडत नाही, पण जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण, हे ठरवून टाकले. तुम्हाला तुमचे दुकान बंद करायला लावले, अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वाभाडे काढले. बाळासाहेब नेहमी शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहायचे म्हणून शिवसेना मोठी झाली. तुम्ही घरात बसून आणि फेसबुक लाईव्ह करून तुमची शिवसेना छोटी करून टाकली. कार्यकर्त्यांना पेटवा मशाल, आम्ही झोपतो बंगल्यात खुशाल!!, अशी तुमची मनोवृत्ती तुम्हाला डब्यात घेऊन गेली. तुमचे “उद्योग” तर खूप आहेत पण अजून आम्ही ते काढले नाहीत, असा घणाघाती हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
कुणाल कामराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून आज जे गळा काढत आहेत, त्यांनीच केतकी चितळेला अटक केली. नारायण राणेंना अटक केली. कंगना राणावतचे घर तोडले. हनुमान चालीसा म्हणणाऱ्या राणा दांपत्याला तुरुंगात टाकले. तेव्हा कुठे गेले होते अभिव्यक्ती स्वातंत्र्य??, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. पण आज तेच पाखंडी लोक कुठल्यातरी शिखंडीच्या मागे लपून आमच्यावर वार करत आहेत, अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे + पवारांना ठोकून काढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App