विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि भाजपवर कायमच विरोधकांचा मुस्लिम द्वेषाचा आरोप होत असताना भाजपने मात्र थेट मुस्लिम समाजाशी संपर्क वाढवायचा निर्णय घेतला आहे. भाजप अल्पसंख्यांक मोर्चा देशभरातल्या 32 लाख मुस्लिम परिवारांना ईद पूर्वी “सौगात ए मोदी किट” देणार आहे.
भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी ही माहिती दिली. ईद, नवरात्री, ईस्टर अशा दिवशी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे 32000 कार्यकर्ते देशभरातल्या 32 लाख गरजू आणि गरीब मुस्लिम परिवारांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना सौगात ए मोदी किट वाटतील, असे त्यांनी सांगितले.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतात मुस्लिमांच्या विरोधातला द्वेष वाढला. मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे, असा अपप्रचार काँग्रेस सह सगळ्या विरोधकांनी तुफान चालवला, पण मोदी सरकारने पसमांदा मुस्लिम, त्याचबरोबर गोरगरीब मुस्लिम यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या. या योजनांना मुस्लिम समुदायाने देखील चांगला प्रतिसाद दिला.
आता मोदी सरकारने Waqf सुधारणा बिल संसदेत मांडले आहे. त्या विरोधात देखील काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी तुफान प्रचार चालवला आहे, पण हा राजकीय विरोध बाजूला सारत मोदी सरकारने थेट मुस्लिम समुदायांची संपर्क करण्यात करण्याचा उपक्रम आणून तो भाजप अल्पसंख्यांक मोर्चाला दिला.
भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे 32000 कार्यकर्ते देशभरातल्या 32000 मशिदींशी संपर्क साधून 32 लाख गरीब मुस्लिम परिवारांना “सौगात ए मोदी” हे किट देणार आहेत. या किट मध्ये खाद्यपदार्थ, त्याचबरोबर घरातल्या एका महिलेला सलवार सूटचे कापड या वस्तूंचा समावेश आहे. या एका किटची किंमत सुमारे 500 ते 600 रुपये आहे. “सौगात ए मोदी” किट द्वारे मुस्लिम समुदायाशी थेट संपर्क साधण्याचे हे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांनी आणि मुल्ला मौलवींनी या उपक्रमाचे स्वागत केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App