जयकुमार गोरेंच्या बदनामीत पवारांच्या पक्षाचा हात; आरोपी थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या संपर्कात; फडणवीसांचा विधानसभेत घणाघात!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : फडणवीस सरकार मधले मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात पवारांच्या पक्षाचा हात असल्याचे आढळले आणि त्या प्रकरणातले आरोपी थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या संपर्कात असल्याचे पुरावे सापडले, असा गौप्यस्फोट करणारा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केल्यामुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवाराचा कायद्याच्या कचाट्यात अडकले. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणाची सगळी चौकशी आणि तपास करून तड लावली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जयकुमार गोरे यांना एका महिलेने गंभीर आरोप करत अडचणीत आणले होते. जयकुमार गोरे यांनी आपले विवस्त्र फोटो आपल्याला पाठवून आपल्याला ब्लॅकमेल केले, असा आरोप एका महिलेने केला होता. त्यामुळे जयकुमार गोरे अडचणीत सापडले होते. पण पुढच्या काही दिवसांमध्येच संबंधित महिला खंडणी घेताना हा रंगेहात सापडली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी आणि तपास केल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले. हे सत्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यांसह विधानसभेत मांडले.



मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले :

जयकुमार यांचे व्हिडिओ तयार करणारे आरोपी तुषार खरात अनिल सुभेदार आणि अन्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांच्या सतत संपर्कात होते त्यांचे शंभर कॉल आणि त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध झाले. ते प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात होते‌. आरोपींनी त्यांना व्हिडिओ पाठवले. प्रभाकर देशमुख यांची त्यांना उत्तरे आली.

पण त्या पलीकडे जाऊन एक गंभीर बाब समोर आली, ती म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या देखील हे आरोपी संपर्कात होते आरोपींनी या दोघांनाही संबंधित व्हिडिओ पाठवले होते त्यांचे त्यांच्याशी बोलणे झाले होते याचे सगळे पुरावे आता पोलिसांच्या हाती आले आहेत. या सगळ्या गंभीर प्रकरणाची चौकशी आणि तपास पुढे नेऊन त्याची तड लावू. पण त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे असे कोणालाही सार्वजनिक जीवनातून उठवण्यासाठी अशा प्रकारची बदनामी करणे योग्य आहे का??, याचे आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या गंभीर आरोपांमुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार कायद्याच्या कचाट्यात अडकले. या सगळ्या प्रकरणाची चौकशी पुढे सुरू झाल्यावर त्यांना पोलिसांसमोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.

Supriya and Rohit Pawar indulge in Jayakumar Gore defamation case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात