मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई :Kunal Kamra महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणीमुळे विनोदी अभिनेता कुणाल कामरा सध्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. ताज्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कामराला आज म्हणजेच २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.Kunal Kamra
, कुणाल कामराने त्याच्या अलीकडील शोमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित घटनांची खिल्ली उडवली होती आणि एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटले होते. यानंतर शिंदे समर्थक शिवसैनक प्रचंड संतापले आहेत. त्यांनी कामाराने ज्या स्टुडिओत ही टिप्पणी केली तो स्टुडिओ देखील फोडला आणि कामराला अटक करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, खार पोलिसांनी कामराच्या घरी समन्स पाठवले आहे, परंतु तो मुंबईत नसल्याचे सांगण्यात आले आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून, सोमवारी पहाटे कामराविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App