100 दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल ठरला आहे. CM Devendra Fadnavis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे 100 दिवसांच्या आराखड्यानुसार ऊर्जा विभागाअंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाऊर्जा या कंपन्यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी 25 वर्षांच्या राज्याच्या वाटचालीच्या अनुषंगाने ऊर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याची योजना निश्चित केली आहे. त्यानुसार 100 दिवसांच्या आराखड्याअंतर्गत वीजविषयक सार्वजनिक कंपन्यांसाठी विविध उद्दिष्टे ठरविण्यात आली होती. त्यांची माहिती व ती किती पूर्ण झाली याचा लेखाजोखा देणारे ‘हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’ हे प्रगती पुस्तक महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी लिहिले आहे.
100 दिवसांच्या आराखड्याअंतर्गत, महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल करून वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत पंप बसवणे तसेच प्रधान मंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याबाबत उद्दिष्टापेक्षा जास्त कामगिरी झाली आहे. 100 दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल ठरला आहे. तसेच कामगिरीचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित करण्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा विभागाने स्वतःपासून केली आहे.
एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीवेळी पुस्तकाचे प्रकाशन झाले. बैठकीला राज्यमंत्री मेघना बोर्डिकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा), उद्योग सचिव, महावितरणचे अध्यक्ष, महापारेषणचे अध्यक्ष, महानिर्मितीचे अध्यक्ष, एमएसईबी होल्डिंग कंपनीचे वित्त संचालक व स्वतंत्र संचालक उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App