विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिशा सालियन प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका, अशी विनंती करणारे उद्धव ठाकरेंनी एकदा नव्हे, तर दोनदा फोन केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पाच वर्षांपूर्वीच्या घटनाक्रमाचा उल्लेख त्यांनी त्यावेळी केला. Disha salian
दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन तिच्या वडिलांनी हायकोर्टात अर्ज करून आदित्यच्या अटकेची मागणी केली. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. पाच वर्षांपूर्वी संबंधित प्रकरण घडल्यानंतर त्यामध्ये एक मंत्री असल्याचा उल्लेख मी आणि नितेश राणे यांनी केला होता. त्यावेळी ते प्रकरण सचिन वाजे हाताळत होता. त्यामुळे पोलिसांनी ते प्रकरण दडपून टाकले.
परंतु उद्धव ठाकरे यांनी मला दोनदा फोन करून त्या प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका अशी विनंती केली होती. मला मुलगा आहे आणि तुम्हालाही दोन मुले आहेत त्यामुळे तुम्ही माझ्या मुलाचे नाव त्या प्रकरणात घेऊ नका असे उद्धव ठाकरे फोनवर म्हणाले होते. पण मी त्यावेळी त्यांना तुमचा मुलगा माझ्या घरासमोर कुणी दिना मोरिया राहतो त्याच्याकडे येतो. ते रात्री चार-पाच तास काय धिंगाणा चालतो हे मला माहिती आहे. तुम्ही त्याला आवरा असे सांगितले होते. तुम्ही जे नाव घेताय ते नाव मी कधीच घेतले नव्हते. मी फक्त दिशा सालियन प्रकरणात एक मंत्री होता त्याविषयीचे पुरावे पोलिसांकडे आहेत एवढेच सांगितले होते, असे नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सालियन कुटुंबीयांच्या घरी नेहमी जात होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यावेळी कुणी दोषी नाही, वगैरे जबानी घेतली होती. पण पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांना ताब्यात घेऊन आता जरी चौकशी आणि तपास केल्यानंतर त्या संदर्भातले पुरावे समोर येतील, अशी पुस्ती नारायण राणे यांनी जोडली. राणे कुटुंबीयांकडे जे पुरावे आहेत, ते पुरावे पोलिसांकडे देखील आहेत. पोलिसांनी आमच्याकडे काही पुरावे मागितले तर आमचे पूर्ण सहकार्य राहील, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App