विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले दहा; पण आजोबा कसे आणि किती लढले नातवाने सांगितले पाहा!!, असे आज मुंबईत घडले. Rohit Pawar
एबीपी माझाने महाराष्ट्राचे व्हिजन या विषयावर विविध नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी एक मुलाखत (शप) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची घेतली. या मुलाखतीत रोहित पवारांना भाजपची वाढ आणि महाविकास आघाडीची कमतरता या विषयावर मुलाखतकर्त्याने प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाल्यानंतर आम्ही लोकांमध्ये जावे लोकांची चर्चा करून मुद्दे मांडावे असे सुरुवातीला ठरले होते, पण आमच्यातले काही वरिष्ठ लोक कुठल्या पक्षाला किती जागा त्या कुणी लढवायच्या या चर्चेत जास्त गुंतले. तो एक प्रोसिजरचा भाग होता. सामान्य भाषेत बोलायचे झाले तर आमच्यातले काही लोक हवेत गेले. पण पवार साहेब नेहमी जमिनीवर राहून काम करतात तसे त्यांनी काम केले आणि लढले, पण जी एक कम्बाईन स्ट्रॅटेजी अपेक्षित होती तशी स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीला आखता आली नाही. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला.
रोहित पवारांनी या मुलाखतीत फक्त १० आमदार निवडून आणू शकलेल्या शरद पवारांचा कौशल्याने राजकीय बचाव केला. आणि पराभवाचे खापर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांवर टाकून दिले. मात्र त्याविषयी एबीपी माझाच्या मुलाखतकर्त्याने क्रॉस क्वेश्चनिंग केले नाही. किंवा त्या प्रश्नावर उपप्रश्न देखील विचारला नाही.
त्यापुढे रोहित पवार म्हणाले, आमच्यातले काही लोक हवेत गेले. त्यामुळे लोकसभेत चाललेले बेरोजगारी, संविधान, शेती या मुद्द्यांवर आक्रमकपणे नंतर कोणी बोललेच नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहिला. त्या उलट महायुतीने एकसंधपणे काम केले लाडकी बहीण योजना आणली. सगळी आर्थिक ताकद संघटनात्मक ताकद त्यांच्या बाजूने उभी केली म्हणून महाविकास आघाडीचा पराभव झाला.
या वक्तव्यातून रोहित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आर्थिक ताकद कमी पडली. शरद पवारांनाच महाविकास आघाडीत समन्वय साधता आला नाही, वेगवेगळ्या तोंडांनी बोलणाऱ्या नेत्यांना आवर घालता आला नाही, याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App