वृत्तसंस्था
नागपूर : Nagpur riots नागपुरात भडकलेल्या हिंसेचे उदात्तीकरण करीत हिंसा पुन्हा भडकावी यासाठी दंगलीच्या व्हिडिओवर देशविघातक कॅप्शन लिहून व्हायरल करणारा नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान याच्यासह सहा आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Nagpur riots
सायबर सेलचे डीसीपी लोहित मतानी यांनी ही माहिती दिली. फहीम खानसह अनेक आरोपींनी “गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा’, अशा हिंसेला चिथावणी देणाऱ्या कॉमेंट्स लिहून दंगलीचे व्हिडिओ व्हायरल केल्याचे पोलिस तपासणीत उघडकीस आले आहे. सोमवारपासूनआतापर्यंत फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवरून सुमारे २३० चिथावणीखोर पोस्ट शोधण्यात आल्या आहेत. यात काही व्हिडिओही आहेत. यापैकी ५० आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून एकूण ४ एफआयआर दाखल केल्याची माहिती डीसीपी मतानी यांनी दिली. फहीम खानचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.
सहा ठिकाणी कर्फ्यूत अंशत: सवलत
नागपूरच्या ११ पोलिस ठाण्यांतर्गत लावण्यात आलेल्या कर्फ्यूचा आढावा घेतल्यानंतर पोलिस आयुक्तांनी नंदनवन व कपिलनगर पोलिस ठाण्याअंतर्गत कर्फ्यू पूर्णपणे उठवला, तर लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा तसेच यशोधरानगर ठाणे क्षेत्रातील कर्फ्यूमध्ये दुपारी २ ते ४ या वेळेत शिथिल करण्यात येत आहे. यानंतर कर्फ्यू पूर्ववत सुरू राहील. तसेच कोतवाली, गणेशपेठ, तहसीलमधील कर्फ्यू पुढील आदेशापर्यंत कायम राहील. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपिलनगर या ११ पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रात कर्फ्यू लागू केला होता.
५० टक्के पोस्ट डिलीट
काही साेशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या ५० टक्के पोस्ट डिलिट करण्यात आल्या आहेत, तर व्हाॅट्सॲप व गुगलला पोस्ट आणि व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहे. यात अजून तरी बांगलादेश वा बाहेरील देशातून विघातक पोस्ट लिहिण्यात आल्या, असे निश्चित सांगता येत नाही. कारण प्रोफाइलमध्ये एखाद्याने एखाद्या देशाचे नाव लिहिले म्हणून संबंधित लगेच त्या देशाचा नागरिक होत नाही. हा तपासाचा भाग आहे, असे मतानी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App