विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
₹25 लाख रोख रक्कम, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम सुतार हे 100 वर्षांच्या वयातही शिल्पकलेसाठी सतत कार्यरत आहेत. सध्या इंदू मिल येथे निर्माणाधीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील शिल्प तयार करण्याचे कार्यही ते करीत आहेत. त्यांचे अद्वितीय योगदान लक्षात घेऊन 12 मार्च 2025 रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
साहित्य, कला, विज्ञान, संस्कृती, समाजसेवा पत्रकारिता, प्रशासन आधी क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1995 मध्ये शिवसेना – भाजपच्या पहिल्या युती सरकारने केली होती. यापूर्वी पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, नानासाहेब धर्माधिकारी, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, बाबा आमटे, जयंत नारळीकर, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अशोक सराफ आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App