प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis राज्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर रील्स तयार करून आपण काम करत असल्याचे भासवतात. आता अशा बेशिस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकार नवीन जीआर काढणार आहे. बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमदार परिणय फुके यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदरील माहिती दिली.CM Fadnavis
आमदार परिणय फुके यांनी अधिकार आणि कर्मचाऱ्यांसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. अधिकारी आणि कर्मचारी वर्ग रिल्स टाकतात. यातून राज्य तेच चालवतात असा भास निर्माण करतात. यासंदर्भात कडक नियम आणि कारवाई करणे आवश्यक आहे, असे परिणय फुके म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त उत्तर दिले.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री?
आमदार परिणय फुके यांच्या लक्षवेधीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नियम तयार झाले तेव्हा सोशल मीडिया नव्हते. आपल्या ड्युटीला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न अधिकारी देखील करतात. सिटिजन एन्गेजमेन्ट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा. यासंदर्भात कडक नियम तयार करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सेवा शर्थीचे नियम आहेत 1989 चे त्यात वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग आणि वर्तवणूकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात सविस्तर जीआर काढला जाणार आहे. बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाही असे मी आश्वासित करतो असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यूपीएससीच्या धर्तीवर राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत देखील कॅलेंडर निश्चित केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. एमपीएससीची परीक्षा या वर्षीपासून आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी काही नागरिकांचा विरोध आहे. मात्र हा विरोध ग्राह्य धरणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. लवकरच एमपीएससीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भरती करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App