विशेष प्रतिनिधी
पुणे : शिक्षण सम्राट डी वाय पाटील DY patil यांच्या नातवावर काल बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आज पिंपरी चिंचवड मधल्या डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली गेली. DY patil
डी. वाय. पाटील यांचे नातू पृथ्वीराज संजय पाटील यांनी विवाहाचे आमिष दाखवून 29 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केला. इतकेच नाही तर तिला गर्भपात करायला लावला, अशा आशयाची तक्रार संबंधित तरुणीने ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पृथ्वीराज पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
डी. वाय. पाटील यांच्यासारख्या शिक्षण सम्राटाचा नातू आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पुतण्या बलात्कार प्रकरणात अडकल्यामुळे कोल्हापूर मधल्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सतेज पाटलांच्या राजीनामाची मागणी झाली. या प्रकरणाचे पडसाद महापालिका निवडणुकीवर उमटवायची चर्चा सुरू झाली.
त्या पाठोपाठ आज पिंपरी चिंचवड मधल्या डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली गेली. बॉम्ब ठेवण्याचा ई-मेल कॉलेज प्रशासनाला मिळाला तो यांनी पोलिसांना फॉरवर्ड केल्यानंतर बॉम्ब शोधक पथक कॉलेजमध्ये दाखल झाले पण यादरम्यान कॉलेजमध्ये गोंधळ उडाला कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत्या. बॉम्बशोधक पथकाने पुरेसा शोध घेतल्यानंतर तिथे बॉम्ब आढळला नाही आणि ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App