पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारताने ऊर्जा संक्रमणासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्याचेही सांगितले.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआयएम नागपूर येथील 2 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी आणि गोल्फ ॲकॅडमी व लर्निंग सेंटरचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आयआयएम नागपूर येथील सौरऊर्जा प्रकल्प हे शाश्वततेकडे तसेच गोल्फ ॲकॅडमी व लर्निंग सेंटर हे क्रीडा पायाभूत सुविधांच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. आयआयएम नागपूरचा सुंदर परिसर नेट झिरोकडे वेगाने वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारताने ऊर्जा संक्रमणासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असून आयआयएम नागपूरसारख्या संस्थांनी या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आपण यापूर्वीच ऊर्जा क्षेत्रात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केली असून 2030 पर्यंत एकूण ऊर्जेच्या गरजैपैकी 52 टक्के ऊर्जा नवीकरणीय, अपारंपरिक स्रोतांपासून उपलब्ध होणार आहे.आयआयएम नागपूर विविध क्षेत्रांमध्ये मानके निश्चित करत आले आहे. यातून आयआयएमची उत्कृष्टतेप्रतीची वचनबद्धता दिसते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोल्फ ॲकॅडमीद्वारे क्रीडा पायाभूत सुविधांना आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शाश्वतता आणि उत्कृष्टता यावर वाटचाल करणारे आयआयएम नागपूर भविष्य घडवित आहे.
यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार आशिष देशमुख, आयआयएम नागपूरचे अध्यक्ष, संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
हत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App