Devendra Fadnavis : ऊर्जा साठवणुकीसाठी पंप्ड स्टोरेज प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय!

Devendra Fadnavis

पंप्ड स्टोरेज धोरणामुळे राज्यात वीज साठवणूक सक्षम होईल आणि ग्रिड अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनेल.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे राज्यातील वीज उपलब्धता वाढवण्यासाठी आणि पंप्ड स्टोरेज प्रकल्पांच्या (PSPs) अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली.Devendra Fadnavis

शासनाने सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे PSPs, LIS (लिफ्ट इरिगेशन स्कीम) सह PSPs आणि संकरित सौर किंवा अन्य अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी धोरण स्वीकारले आहे. या धोरण अंतर्गत करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार सुरू असलेल्या 38 पंप्ड स्टोरेज प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.



पंप्ड स्टोरेज धोरणामुळे राज्यात वीज साठवणूक सक्षम होईल आणि ग्रिड अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनेल. यातून मेगावॅट स्तरावरील ऊर्जा साठवण प्रकल्प विकसित होतील, पायाभूत सुविधा व उपलब्ध जमिनीचा योग्य वापर करता येईल, जल-सौर संकरित ऊर्जा प्रकल्पांना चालना मिळेल, पाण्याच्या आंतर-बेसिन हस्तांतरणासाठी मोठ्या लिफ्ट सिंचन योजनांना मदत होईल, खासगी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.

बैठकीस मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Decision to accelerate pumped storage projects for energy storage

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात