Chief Minister Fadnavis : तीन महिन्यात तयार होणार महाराष्ट्रची ‘स्पेस पॉलिसी’ – मुख्यमंत्री फडणवीस

Chief Minister Fadnavis

कार्यक्षमता आणि पारदर्शक प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग…


विशेष प्रतिनिधी

उत्तन : Chief Minister Fadnavis  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे गुरुवारी ‘स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स कॉनक्लेव्ह’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  ( Devendra Fadnavis )  म्हणाले की, स्पेस टेक आपल्या जीवनाचे अभिन्न अंग होत आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेस पॉलिसी तयार करून जगाच्या स्पेस तंत्रज्ञानाचे 8-10 टक्के भागीदार होऊन या क्षेत्रात 44 बिलियन डॉलर्सच्या व्यवसायाचे लक्ष्य ठेवले. परिणामी 2014 मध्ये केवळ 1 स्पेस टेक स्टार्टअप होता तेथे आज 124 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 189 स्पेस स्टार्टअप्स काम करत आहेत.Chief Minister Fadnavis

स्पेस टेकमुळे रिमोट सेन्सिंग, ड्रोन तंत्रज्ञान आणि जीपीएसचा उत्तम वापर करून प्रशासनात कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता येत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वर्षानुवर्षे लागणाऱ्या विविध प्रकल्पांची निर्मिती स्पेस टेकमुळे गतीशक्ती प्लॅटफॉर्मअंतर्गत नियोजित वेळेत आणि नियंत्रित खर्चात दर्जेदार पद्धतीने होत आहे, यामुळे पीक विमा क्षेत्रात 2500 कोटींची बचत होणार आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, स्पेस टेकच्या साहाय्याने जलयुक्त शिवारसारख्या योजनेच्या माध्यमातून 20,000 गावांमध्ये वॉटर बजेटिंग करून त्यांना दुष्काळमुक्त करता आले, असे सांगत शेतीशी निगडीत तंटे मिटवण्यासाठी स्पेस टेकचा उपयोग व योग्य नकाशे तयार करण्याची क्षमता अधोरेखित केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ‘स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स कॉनक्लेव्ह’मधून येणार्‍या सूचनांवर विचार करून सरकार यावर काम करत असून येत्या 3 महिन्यात महाराष्ट्राची स्पेस पॉलिसी तयार करण्याचे आश्वस्त केले. यावेळी लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Space Policy to be prepared in three months Chief Minister Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात