‘या’ खासगी गुप्तहेराचा शोध घेऊन चौकशी करण्याचे आवाहन केले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Bofors scam case बोफोर्स घोटाळा प्रकरणाच्या चौकशीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने अमेरिकेला एक पत्र पाठवले आहे. सीबीआयने अमेरिकेला पाकिस्तानी गुप्तहेर मायकेल हर्शमॅनचा शोध घेण्याचे आणि त्याची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले आहे.Bofors scam case
मायकेल हर्शमॅनचा दावा काय होता?
सीबीआयने अमेरिकेला ‘लेटर ऑफ रोगेटरी’ पाठवले आहे आणि खासगी गुप्तहेर मायकेल हर्शमॅनला शोधून त्याची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले आहे. मायकेल हर्शमॅन याने एका वृत्तवाहिनीवर दावा केला होता की ते ६४ बोफोर्स तोफा घोटाळ्याच्या तपासात मदत करू शकतो. १९८० च्या दशकात भारतात बोफोर्स घोटाळा उघडकीस आला होता. या काळात तत्कालीन राजीव गांधी सरकारवर घोटाळ्याचा आरोप झाला.
दिल्ली न्यायालयाच्या आदेशानुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये अमेरिकेला पत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये अमेरिकन नागरिकाच्या टीव्ही मुलाखतीला तपासाचा आधार बनवण्यात आला आहे. प्रशासकीय मंजुरींमुळे ते पूर्ण होण्यासाठी ९० दिवस लागू शकतात.
एका भारतीय टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोफोर्स घोटाळ्यात अनियमितता असल्याचा दावा करण्यात आला. या दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी अमेरिकेत तपास आवश्यक मानला गेला आहे. दिल्ली न्यायालयाने सीबीआयचा अर्ज स्वीकारला आहे. यानंतर अमेरिकेच्या न्यायिक अधिकाऱ्यांना एक विनंती पत्र पाठवण्यात आले आहे. अमेरिकेला कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर आवश्यक पुरावे गोळा करण्याची विनंती केली जाईल
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App