गेल्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला गेली होती, त्यामुळे तपास यंत्रणांना तिच्यावर आधीच संशय होता. Kannada film actress
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरूतील केंम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. तिच्याकडून १४ किलो सोने जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुबईहून आलेल्या रान्याला तिच्या बेल्टला बांधलेल्या १४ किलो सोन्याचे बार आणि ८०० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह पकडण्यात आले. विशेष म्हणजे ही अभिनेत्री पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आहे.
सोमवारी रात्री रान्या राव दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने परतली. गेल्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला गेली होती, त्यामुळे तपास यंत्रणांना तिच्यावर आधीच संशय होता. जेव्हा ती बंगळुरू विमानतळावर पोहोचली तेव्हा अधिकाऱ्यांनी तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवले. तपासणी केल्यावर असे आढळून आले की तिने खूप सोने घातले होते आणि तिच्या कपड्यांमध्ये काही सोन्याचे बार देखील लपवलेले होते. अटकेनंतर, रान्या रावला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार विमानतळावर पोहचल्यानंतर रान्याने सर्वात आधी स्वतःची ओळख कर्नाटक पोलिस महासंचालक यांची मुलगी म्हणून करून दिली आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून तिला घरापर्यंत जाण्यासाठी सुरक्षेची मागणी केली होती. आता अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App