विशेष प्रतिनिधी
मुंबई : जात पडताळणी उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट तसेच राष्ट्रीय प्रमाणपत्रांसह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्यामुळे समाजातल्या सर्व गरजू घटकांना याचा मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी आता ५०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीचा भुर्दंड सर्वसामान्यांना पडणार नाही. chandrashekhar Bawankule
लाभ कशा संदर्भात??
* जात पडताळणी प्रमाणपत्र • उत्पन्नाचा दाखला * रहिवासी प्रमाणपत्र * नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट * राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह * शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ
* लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा
* यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल.
* दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार.
* निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांचे आदेश.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App