विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटक मधल्या सिद्धरामय्या यांच्या काँग्रेसच्या स्थिर सरकारला अखेर अस्थिरतेचे हादरे बसले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आशा काही “कारवाया” केल्या की त्यामुळे राज्यात नेतृत्व बदलाचे वारे शिरले. याची सुरुवात काही माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी केलेल्या वक्तव्यातून झाली नाही, तर ती त्या आधीपासूनच स्वतः शिवकुमार यांच्या काही कारवायांपासून झाली.
डी. के. शिवकुमार महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला इशा फाउंडेशन मध्ये हजर राहिले. त्यावेळी गृहमंत्री अमित शाह हे देखील संपूर्ण रात्र त्याच कार्यक्रमात हजर होते. सद्गुरूंच्या उजव्या बाजूला डी. के. शिवकुमार बसले होते, तर डाव्या बाजूला अमित शाह बसले होते. त्यानंतर डी. के.ओ शिवकुमार यांनी आपण जन्माने हिंदू असल्याचे आवर्जून सांगितले. त्याआधी त्यांनी प्रयागराजला कुंभमेळ्यात जाऊन त्रिवेणी संगमावर स्नान केले होते. यातून आपली “हिंदू” आयडेंटिटी जास्तीत जास्त ठसवण्याचा प्रयत्न शिवकुमार यांनी केला आणि काँग्रेस श्रेष्ठींना योग्य तो राजकीय संदेश पोचवण्याची व्यवस्था केली.
#WATCH | Bengaluru: When asked about Congress leader Dr M Veerappa Moily's statement on him, Karnataka Dy CM DK Shivakumar says, " I don't want to comment on it. I was in a workers' meeting. I went to give the pledge to all the booth presidents as I have to travel all over the… https://t.co/xuBgHIqTUs pic.twitter.com/NtqS8KD10T — ANI (@ANI) March 3, 2025
#WATCH | Bengaluru: When asked about Congress leader Dr M Veerappa Moily's statement on him, Karnataka Dy CM DK Shivakumar says, " I don't want to comment on it. I was in a workers' meeting. I went to give the pledge to all the booth presidents as I have to travel all over the… https://t.co/xuBgHIqTUs pic.twitter.com/NtqS8KD10T
— ANI (@ANI) March 3, 2025
Moily's remarks his personal opinion, high command's decision final: Karnataka Ministers Priyank Kharge, Santosh Lad Read @ani Story | https://t.co/fsBHKQLdoM#VeerappaMoily #PriyankKharge #SantoshLad #DKShivkumar pic.twitter.com/PmbUzgwsW2 — ANI Digital (@ani_digital) March 3, 2025
Moily's remarks his personal opinion, high command's decision final: Karnataka Ministers Priyank Kharge, Santosh Lad
Read @ani Story | https://t.co/fsBHKQLdoM#VeerappaMoily #PriyankKharge #SantoshLad #DKShivkumar pic.twitter.com/PmbUzgwsW2
— ANI Digital (@ani_digital) March 3, 2025
म्हणूनच काँग्रेसमध्ये कर्नाटक मधल्या नेतृत्व बदलाचे वारे सुरू झाले आणि त्यातूनच वीरप्पा मोईली यांचे वक्तव्य. आले डी. के. शिवकुमार यांचे नेतृत्व उत्तम आहे. मीच त्यांना पहिल्यांदा आमदारकीचे तिकीट देऊन राजकारणात पहिली संधी दिली. त्यानंतर त्यांनी स्वतःचे नेतृत्व चांगले विकसित केले. आता कोणीही त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखू शकणार नाही असे वीरप्पा मोहिली म्हणाले. वीरप्पा यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे आमदार शिवगंगा यांनी लगेच पाठिंबा दिला.
त्यामुळेच कर्नाटकात नेतृत्व बदलाचे वारे जोराने वाहायला लागले. सिद्धरामय्या मंत्रिमंडळातले मंत्री प्रियांक खर्गे आणि संतोष लाड यांना प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी पुढे यावे लागले वीरप्पा मोहिली यांनी व्यक्तिगत मत व्यक्त केले, पण अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडच घेईल, असे हे दोन्ही नेते म्हणाले. पण स्वतः शिवकुमार यांनी या घडामोडींवर वक्तव्य करण्याचे टाळले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App