Chief Minister Fadnavis : पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स तयार केला – मुख्यमंत्री फडणवीस

Chief Minister Fadnavis

‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’चे उद्घाटन केले.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chief Minister Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.Chief Minister Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे हॅपीनेस इंडेक्स होते, त्यांनी महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स तयार करण्याचे काम केले. प्रत्येक व्यक्ती आपले दुःख विसरुन निखळपणे हसू शकेल, असे त्यांचे साहित्य आणि वक्तव्य होते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.



पु. ल. देशपांडे यांचे बोलणे अतिशय चपखल असायचे, मर्मावर बोट ठेवताना समोरच्याला कुठलेही दुःख होणार नाही, असे त्यांचे लिखाण होते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील पु. ल. देशपांडे यांचा एक किस्साही सांगितला. तसेच पु. ल. आज असते तर त्यांनी राजकीय क्षेत्रातील लोकांना पाहून व्यक्ती आणि वल्ली नव्हे तर फक्त वल्लीच…, असे लेखन केले असते, असे मुख्यमंत्री फडणीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’ची निर्मिती अतिशय सुंदर केली आहे. मराठी माणूस रसिक असून कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी कलाकारांचे तसेच रसिकांचे योगदान मोठे असून संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, नाटक आणि सिनेमा क्षेत्रात श्रीराम लागू, निळू फुले तर साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, त्याचबरोबर लोककला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यातून मोठे योगदान दिले आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

इतिहासात एखाद्या संस्कृतीचे मूल्यमापन तिथल्या साहित्य, कलानिर्मितीवर केले जाते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या गावागावांतील नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठीचे काम निश्चितचे केले जाईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार भाई गिरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

P L Deshpande created the Happiness Index of Maharashtra Chief Minister Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात